World Health Day 2024:  Sakal
लाइफस्टाइल

World Health Day 2024: स्वतःसाठी दररोज एक तास द्या, निरोगी आयुष्यासाठी डॉक्टरांचा सल्ला

World Health Day 2024: निरोगी राहण्यासाठी 15 मिनिटं ध्यान करणे गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

World Health Day 2024 do meditation hour every day, doctors advice for a healthy life

आजघडीला अनेकजण रक्तदाब, मधुमेह, ताणतणाव यांसारख्या आजारांना बळी पडत आहेत. परंतु, आहे त्यात समाधान मानून, स्वतःसाठी रोज 45 मिनिटे व्यायामाला आणि पंधरा मिनिटे धारणा, ध्यानासाठी द्या. माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.

मागील पिढीत लोक अगदी शंभर वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगायचे. हल्ली मात्र अनेक जण तारुण्यातच अनेक व्याधींनी ग्रस्त असल्याचे दिसून येते. रक्तदाब, मधुमेह, ताण-तणाव, हृदयविकार आदी विकार तर सर्वसामान्य झाले आहेत.

यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे बदललेली जीवनशैली आहे. सध्या माणसाच्या जेवणाच्या, झोपण्याच्या वेळादेखील निश्चित नाही. त्यात फास्टफूडचे वाढलेले सेवन अशा प्रकारे आपल्या जीवनशैलीत माणसाने स्वतःला हवे तसे बदल केल्यानेच अनेक आजारांना माणूस स्वतः निमंत्रण देत आहे. या जीवनशैलीत बदल केल्यास माणूस निरोगी आयुष्य जगू शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे.

  • काय करावे?

रोज 45 मिनिटे योगा, व्यायाम करावा.

किमान 15 मिनिटे ध्यान करावे.

सकस आहार घ्यावा.

जेवणाच्या वेळा निश्चित कराव्यात.

ताण-तणावापासून दूर राहावे.

वेळेवर झोपावे.

जास्तीची अपेक्षा करण्यापेक्षा आहे त्यात समाधानी राहा.

  • चाळिशीनंतर या चाचण्या कराव्यात

वयाच्या चाळिशीनंतर वर्षांतून किमान दोनवेळा मधुमेह, थायरॉइड, लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन टेस्ट, व्हिटॅमिन डी-३, व्हिटॅमिन बी-१२, २ डी इको, स्ट्रेस टेस्ट या चाचण्या करून घ्याव्यात.

निरोगी आयुष्यासाठी रोज व्यायाम, योगा, धारणा, ध्यान, सकस आहार, वेळेवर झोप हे अत्यंत गरजेचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आहे त्यात समाधानी राहावे. वयाच्या चाळिशीनंतर वर्षातून किमान दोनदा स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी.

— डॉ. प्रमोद दुथडे, एमडी मेडिसीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT