World Milk Day 2024  esakal
लाइफस्टाइल

World Milk Day 2024 : गायीचं की म्हैशीचं कोणतं दूध आहे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?

दोन्ही दूध पौष्टिक असले तरी त्यांच्या पौष्टिकतेत थोडा फरक आहे

सकाळ डिजिटल टीम

World Milk Day 2024 :

जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत एक घटक आपल्या आयुष्यात नेहमी असतो तो म्हणजे दूध. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा हाडे मजबूत व्हावीत यासाठी मुलांना दूध दिले जाते. अन् तरूण म्हातारपणी चहातून दुध रोज आपल्या भेटीस येते.

दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत.दूधामध्ये कॅल्शियम सोबतच लोह, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी आढळते. दुधाच्या सेवनाने हाडे तर मजबूत होतातच पण शरीरातील कमकुवतपणाही दूर होतो. त्यामुळेच लहान डॉक्टरही दूध पिण्याचा सल्ला देतात.

दूध किती प्रमाणात प्यावे याचे अनेक नियम आहेत. पण, अनेकवेळा गायीचं कि म्हैशीचे कोणते दूध आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असा प्रश्न नक्कीच पडतो. त्याबद्दलच आपण जाणून घेऊयात.

बरेच लोक गाईचे दूध पितात. अनेकांना म्हशीचे दूध प्यायलाही आवडते. दोन्ही दूध पौष्टिक असले तरी त्यांच्या पौष्टिकतेत थोडा फरक आहे. गाईचे दूध शरीर निरोगी ठेवते. हे दूध म्हैशीच्या दुधापेक्षा पातळ असून पचायलाही हलके असते. यामध्ये प्रथिने, अमीनो ॲसिड, व्हिटॅमिन बी, १२, पोटॅशियम आढळतात. हे सहज पचत असल्याने लहान मुलांना आणि वृद्धांना ते सहज देता येते.

म्हशीचे दूधही शरीरासाठी खूप पोषक असते. पण ते गाईच्या दुधापेक्षा जाड, मलईदार आणि फिकट पिवळ्या रंगाचे असते. फॅटसोबतच यामध्ये झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी2 आणि व्हिटॅमिन सी देखील आढळते.

लहान मुले आणि प्रौढांना विशेषतः गाईचे दूध द्यावे कारण ते हलके असते. तर प्रौढ लोक म्हशीचे दूध पिऊ शकतात कारण या दुधात फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.

दूध पिण्याचे फायदे

दूध हा पूर्ण आहार आहे

लहानपणी तुम्ही मोठ्यांना दूध हा पूर्ण आहार आहे असे म्हणताना ऐकले असेल. त्यात प्रथिनांसह अमीनो ऍसिड असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि खराब झालेल्या पेशींना देखील बरे करतात.

हाडांसाठी पोषक आहे

दुधाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. याच्या सेवनाने हाडांचे आजार ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव होतो. रोज दूध प्यायल्याने शरीर मजबूत होतेच पण शरीराचा योग्य विकास होण्यास मदत होते.

मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर

दूध प्यायल्याने मेंदू केवळ तीक्ष्ण होत नाही तर स्मरणशक्तीही वाढते. दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन बी आणि बी 12 स्मरणशक्ती आणि मेंदूचा विकास करण्यास मदत करते. मुलांना दूध दिल्याने मेंदूची वाढ होते आणि शरीरही निरोगी राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT