World Red Cross Day 2024  esakal
लाइफस्टाइल

World Red Cross Day 2024 : वारांगणांच्या अधिकारांसाठी लढणारी रेडक्रॉस

सकाळ वृत्तसेवा

World Red Cross Day 2024 : देह विकणाऱ्या महिलांना सन्मानाने जगण्यासाठी आशेचा किरण फुलवणारी लाल रंगातील ‘अधिक'' चिन्ह ओळख असणारी संस्था इंडियन रेडक्रॉस सोसायटी. जुन्या मंगळवारी परिसरात २३ वर्षांपासून या संस्थेचा सेवाधर्म अविरत सुरू आहे. एचआयव्हीविरोधात जाणीव-जागृती करून ‘रेडक्रॉस''ने वारांगणांशी नात्याची वीण घट्ट केली. संस्थेने १५० वारांगणांचे पुनर्वसन केले असून मुलांचे जन्मदाखले मिळवून दिले आहेत. त्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष ही संस्था करीत आहे.

बुधवारी (ता.८) जगभरात जागतिक रेडक्रॉस दिन साजरा होत असताना उपराजधीनीतील रेडक्रॉस संस्थेचे कार्य मोलाचे आहे. गंगाजमना वस्ती असलेल्या जुन्या मंगळवारीत रेडक्रॉसचे कार्यालय आहे. येथे वारांगणांच्या वेदनांवर संस्थेचे प्रतिनिधी फुंकर घालताहेत.

जगातील सर्व देशांचा सहभाग असलेल्या या संघटनेची सुरुवात मुळात युद्धात जखमी आणि आजारी सैनिकांच्या देखभालीसाठी झाली. परंतु पुढे व्यापक सेवाधर्माचा वसा संस्थेने घेतला. राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूरपासून तांडा आणि पाडे, गडचिरोलीतील गावं दत्तक घेऊन तेथे आरोग्य सेवा रेडक्रॉस देत आहे. वारांगणांच्या वस्तीत चक्क त्यांचा ‘पिअर''अर्थात सामाजिक कार्यकर्ता म्हणून उभं करण्याचे काम संस्थेद्वारे होतेय.

सध्याचे रेडक्रॉसचे कार्य...

रुग्णालयातील रुग्णांना मदत देणे, बाल कल्याणाचे केंद्र उभारणे, फिरते दवाखाने सुरू करणे, अपंगांसाठी कृत्रिम अवयव तयार करणे, जगभरात भुकंप, महापूर, आग, अपघात, बॉम्बस्फोट अशा आपत्तीच्या वेळी संस्था सज्ज असते. नागपुरातील गंगाजमनामध्ये पूर्वी असुरक्षित संबधामुळे आयुष्यभर एडस् यातना भोगाव्या लागत होत्या, प्रसंगी जीवही जात होता. अशावेळी रेडक्रॉसने मदत केली. ट्रकचालकांसाठी संस्थेने काम केले.

कोण असतात पदाधिकारी ?

या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. सचिव म्हणून प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आर. पी. सिंग यांच्यासह डॉ. शिवकुमार चव्हाण, विनोद मसंद, डॉ. मनोज मानकर,डॉ. अरुप मुखर्जी, डॉ. तुळशीराम मेंढेकर, हेमलता लोहवे काम करीत आहेत.

‘रेडक्रॉस’च्या इतिहासावर एक नजर

युद्धातील जखमींच्या उपचारासाठी स्विस व्यापारी हेन्‍री ड्यूना यांनी ९ फेब्रुवारी १८६३ मध्ये ‘कमेटी ऑफ फाईव्ह'' ही संस्था स्थापन केली, पुस्तकही प्रकाशित केले. पुढे या संस्थेचे विकसित रुप २२ ऑगस्ट १८६४ मध्ये ‘रेडक्रॉस'' या नावाने पुढे आले. या संस्थेची शाखा भारतात २७ मार्च १९२९ रोजी स्थापन झाली. भारतामध्ये गेल्या ९८ वर्षांपासून रेडक्रॉस काम करतेय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT