World Saree Day 2022 esakal
लाइफस्टाइल

World Saree Day 2022 : लगीनसराईत साडीतल्या ग्लॅमरस लुकसाठी या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत

साधारण डिसेंबर जानेवारीचा महिना म्हटला की घरातली लग्नकार्यही वाढतात

सकाळ डिजिटल टीम

World Saree Day 2022 : साधारण डिसेंबर जानेवारीचा महिना म्हटला की घरातली लग्नकार्यही वाढतात, कारण कोणत्याही लगीनकार्यासाठी हिवाळा हा ऋतु खूप अगदीच परफेक्ट असतो. सगळीकडेच आता कडाक्याची थंडी सुरू झाली आहे, स्वेटरशिवाय कोणीही घराबाहेर पडत नाही.

अशात सगळ्यांच्या मनातला प्रश्न म्हणजे थंडीत स्टायलिश आउटफिट कॅरी करणार तरी कसे? अनेक बायका लग्नात साड्या नेसण्याला पसंती देतात, तुम्हीही लग्नासाठी या प्रकारची साडी नेसू, अस तयार होऊ.. असे ठरवल असेलच. पण आता वाढत्या थंडीमुळे आपल्या छान अशा साडीवर स्वेटर घालव लागेल. पण जर तुम्ही आपल्या साडीवर अशा पद्धतीने स्टाइलिंग केली तर तुम्हाला नक्कीच स्वेटर घालण्याची गरज नाही.

लॉन्ग कोट

हिवाळ्यात एकंदरीत लॉन्ग कोट खरंच खूप सुंदरही दिसतात आणि थंडीपासून आपलं रक्षणही करतात. अशात तुम्ही आपल्या साडीवर छान लॉन्ग कोट घालू शकतात. हा लुक आजकाल खूप सेलेब्रिटी कॅरी करता आहेत आणि ते दिसायलाही खूप छान दिसतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती आपल्या साडीच्या काँट्रास्ट रंगाचा किंवा प्रॉपर पैठणीच्या कापडाचा कोट घालू शकतात.

श्रग

वेल्वेटचे श्रग सध्या खूप जास्त चर्चेत आहे, या श्रगमुळे तुमची साडी लपणारही नाही आणि त्याने तुमचं लुकही खूप वेगळा दिसेल. पण फक्त हे करतांना नक्की कोणत्या साडीवर आपण असं श्रग घालव याच भान ठेवा. प्रिंटेड किंवा प्लेन साडीवरच असं श्रग घाला, काठपदारावरती असं काही ट्राय करू नका.

टर्टल नेक ब्लाऊज

टर्टल नेक ब्लाऊज सुद्धा सध्या खूप चर्चेत आहे, दिसायला खूप जास्त स्टायलिश हे ब्लाऊज आहे आणि फूल स्लीव्हच ब्लॉउज असल्याने थंडीचा प्रश्नच नाही. यावरती तुम्ही मॅचिंग किंवा काँट्रास्ट रंगाच ब्लाऊज घालू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT