Yoga Tips esakal
लाइफस्टाइल

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

Yoga Tips : शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे योगा करणे फायदेशीर आहे. अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे योगा करणे फायदेशीर आहे. अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी योगासने करणे लाभदायी ठरते. दररोज योगा केल्याने शरीर तंदूरूस्त राहते. सर्व वयोगटातील व्यक्ती नियमितपणे योगा करू शकतात.

योगामध्ये अशी अनेक योगासने आहेत, ज्याचा सराव घरातील बच्चे कंपनी अर्थात लहान मुले आणि मोठ्या व्यक्ती एकत्रितपणे करू शकतात. कोणती आहेत ही योगासने? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. या योगासनांचा सराव केल्याने लहान मुलांमध्ये एकाग्रता वाढते तर वृद्ध लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

सर्वांगासन

सर्वांगासन हे योगासन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाचा सराव करताना सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपावे. त्यानंतर, दोन्ही पाय एकत्र जोडून हात आणि तळवे जमिनीकडे तोंड करून ठेवा. आता तुमच्या तळहातांनी जमिनीवर दाब देऊन दोन्ही पाय सरळ छताच्या दिशेने उचला.

या स्थितीमध्ये नितंब आणि कंबर जमिनीपासून वर उचलताना कोपर वाकवून कंबरेवर ठेवा. त्यानंतर, शरीराला हाताने आधार देऊन ९० अंशाच्या कोनात ठेवा. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर, तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. आता पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने शरीर फीट राहण्यास मदत होते.

प्राणायाम

मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी नियमितपणे प्राणायामचा सराव करणे फायदेशीर मानले जाते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या प्राणायामचा सराव करू शकतात. विशेष म्हणजे मेंदूच्या पेशींमध्ये ऑक्सिजनचे चांगले परिसंचरण राखण्यासाठी प्राणायामचा सराव उपयुक्त ठरू शकतो. लठ्ठपणा, मधुमेह कमी करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी प्राणायामचा सराव करणे फायदेशीर मानले जाते.

मानसिक शांतीसाठी आणि ताण-तणाव कमी करण्यासाठी हे योगासन लाभदायी आहे. प्राणायाममध्ये कपालभाती, अनुलोम-विलोम यांसारख्या आसनांचा समावेश होतो. या आसनांचा नियमितपणे सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: भाऊ आणि मुलगा यांमध्ये श्रीनिवास पवारांची भूमिका काय?

Assembly Elections Voting Percentage: सर्वाधिक गडचिरोलीमध्ये तर सर्वात कमी नांदेडमध्ये; सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात एकूण किती टक्के मतदान?

IND vs AUS: भारतीय संघात ऐनवेळी बदल, युवा फलंदाजाचा तातडीने केला समावेश; BCCI ने का घेतला असा निर्णय?

ST Bus Service : निवडणुकीचा एसटी सेवेला फटका! लालपरीच्या तब्बल ८८४ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय

IPO Rule: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; पुढील महिन्यापासून बदलणार IPOचे नियम?

SCROLL FOR NEXT