आजकाल केस गळती, केसांना फाटे फुटणे असे अनेक आजार होत आहेत. केसांच्या अशा समस्यांमधून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही योग प्रकार केल्यास तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील.
आजकाल प्रत्येक आजारावर योग कामी येतो. शारीरिक व्याधी असोत वा मानसिक तणाव प्रत्येकावर योग फायदेशीर आहे. योग करण्याचे आपल्याला अनेक फायदे आहेत. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, योग केल्याने तुमच्या केसांनाही फायदा आहे. (Hair Care)
योगविद्येत काही योगासने अशी आहेत. जी केल्याने केसांच्या अनेक समस्या कमी होतात. योग प्रशिक्षक प्रियांका छिब्बर (yogagirl_pc) यांनी सुचवलेल्या 3 आसनांबद्दल जाणून घेऊयात. ते योग प्रकार कोणते आणि त्याचे काय फायदे आहेत हे पाहुयात.
कॅमल योग ज्याला आपण सोप्या भाषेत उंटासारखा योगा असे म्हणू शकतो.यात,गुढग्यांवर बसून मान उंच उंटासारखी करायची आहे. तसेच,केसमोकळे सोडून मान उलट दिशेने मागे वाकवायची आहे. हा योग करताना दोन्ही हात उलट्यादिशेला आपल्या पायांवर टेकवायचे आहेत.
हात मागे अन् डोकंही खालच्या दिशेला वाकवून 30 सेकंद तसेच रहा आणि पुन्हा पहिल्या स्थितीत या. हा योग केल्याने आपलं शरीर लवचिक बनतं.तसेच, केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण सुरळीत होते.
अधोमुखासना आसन देखील तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. हे केवळ तुमच्या केसांची वाढच सुधारत नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी देखील चांगले आहे. यामुळे केसांच्या समस्या कमी होतात.
दीर्घ श्वास घेणे हेही तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी वज्रासनात बसावे. आणि दीर्घ श्वास घ्यावा. दीर्घ श्वास घेतल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो.
- काही योगासनांमुळे रक्त प्रवाह वाढतो, विशेषतः केसांच्या मुळांशी हे आवश्यक पोषक आणि ऑक्सिजन प्रदान करते, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते.
- योगामुळे तणाव कमी होतो असे म्हणतात. तणाव आणि चिंता कमी करून, योगासने केस गळणे कमी करू शकतात.
- नियमितपणे योगा केल्याने शरीरातील संप्रेरकांचे संतुलन राखण्यास मदत होते आणि केसांच्या चांगल्या वाढीसाठी हे महत्त्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.