Yoga Tips:  Sakal
लाइफस्टाइल

Yoga Tips: खुप भूक लागत असेल तर 'या' योगासनांचा करा सराव, स्वत:वर ठेऊ शकाल नियंत्रण

पुजा बोनकिले

उन्हाळात अनेक लोकांना खुप भुक लागते. जास्त भूक लागल्याने वजन वाढू शकते. भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा वापर करतात. काही लोक स्वतःला अधिक व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक दिवसभर झोपतात जेणेकरून त्यांना भूक लागू नये. पण याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. काही योगासानांचा सराव करून तुम्ही भूक नियंत्रण ठेऊ शकता.

हलासना

हलासनाचा सराव केल्याने वाढते वजन आणि भूक नियंत्रणात राहते. हलासन करण्यासाठी जमिनिवर पाठीवर झोपा आणि हळूहळू तुमचे दोन्ही पाय तुमच्या डोक्याच्या मागे वर करा आणि जमिनीला स्पर्श करा. जर तुम्ही तुमच्या पायांनी जमिनिला स्पर्श करू शकत नसाल तर त्यांना कमाल मर्यादेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा आणि काही सेकंद या स्थितीत रहा. या आसनामुळे पोटाची चरबी कमी होते आणि भूकही कमी होते.

विरभद्रासन

विरभद्रासन केल्याने तुम्ही तुमची भूक नियंत्रित करू शकता. विरभद्रासन 2 करण्यासाठी सर्वात आधी सरळ उभे राहून डावा पाय पुढे घेऊन गुडघा वाकवा. यादरम्यान उजव्या पायाचा घोटा बाहेर ठेऊन हात वरच्या दिशेने बाजूला करा. 30 सेकंद या स्थितीत रहा.

अधोमुखासन

भूक कमी करण्यासाठी अधोमुखासनचा सराव नियमित सरू शकता. हा योग करण्यासाठी पोटावर झोपावे आणि हात आणि पाय जमिनीवर ठेवून नितंब वर करा. आता डोके खाली ठेवून जमिनीच्या दिशेने टाच दाबा. 30 सेकंद या स्थितीत रहा, नंतर सामान्य स्थितीत परत या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT