आपला रंग, उंची, दिसणे हे जसे आपल्याला जन्मत: मिळालेले असते त्याचप्रमाणे आपल्या नखांची ठेवण ही अनेकदा आपली आई किंवा वडील यांच्यासारखीच असते. आपण नखांना कितीही शेप दिला किंवा वेगवेगळी नेलपेंट लावून ते आकर्षक दिसावेत यासाठी प्रयत्न केला तरी आपल्या नखांचा नैसर्गिकरित्या एक विशिष्ट आकार किंवा ठेवण असतेच. आपल्या हाताच्या नखांचा हाच आकार आपल्या व्यक्तिमत्त्वाविषयी आपल्याला काही गोष्टी सांगतात. पाहूयात कशाप्रकारच्या नखांच्या लोकांचा व्यक्तिमत्त्व कसे असते याविषयीची सविस्तर माहिती...
लांब नखे:
तुमची नखे लांबसडक असतील तर तुमचे मन सतत संभ्रमावस्थेत असण्याची जास्त शक्यता असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशाप्रकारची नखे असणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूची वाढ ही दोन्ही बाजूने झालेली असते. अशा लोकांची कल्पनाशक्ती तर अफाट असतेच, पण दुसरीकडे ते लॉजिक लावण्यातही खूप पक्के असतात. आजूबाजूचे वातावरण अशा लोकांना सहज व्यापून टाकते, त्यामुळे त्यांची जगाकडून फसवणूक होण्याची शक्यता असते.
लहान पण आडवी नखे:
रुंद नखे असलेले लोक त्यांच्या डाव्या मेंदूचा जास्त प्रमाणात वापर करतात. हे लोक आपल्या मनातील बोलतात. ते रागीट स्वभावाचे असू शकतात. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अशी नखे असणारे लोक जास्त भावनिक असतात. या लोकांचे हृदय हे त्यांच्या बुद्धीवर राज्य करते.
बोटांप्रमाणे गोलाकार नखे:
ज्यांची नखे गोलाकार आणि बोटांच्या आकाराची असतात असे लोक अतिशय भाग्यवान असतात. हे लोक आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात. अशा लोकांच्या आजुबाजूला भांडणे सुरू असतील तर हे लोक मध्यस्थाची भूमिका बजावतात आणि त्यात ते यशस्वीही होतात. हे लोक आनंदी व्यक्तिमत्त्वाचे आणि सामाजिक प्रकारचे असतात. मात्र अशामुळे या लोकांवर विश्वास ठेवणे इतरांना काहीसे अवघड जाते.
बदामाच्या आकाराची नखे:
हे लोक अत्यंत प्रामाणिक असतात, तसेच त्यांची कल्पनाशक्तीही अफाट असते. या लोकांकडे विनम्रता असली तरी तरी सहनशीलता मात्र अजिबात नसते. त्यामुळे अशा लोकांना त्यांच्या मनाविरुद्ध अशा एखाद्या गोष्टीचा सामना करावा लागतो तेव्हा त्यांना राग सहन होत नाही.
तलवारीच्या आकाराची नखे:
तलवारीसारखी नखे असणारे लोक जास्त मेहनती असतात. त्यामुळे त्यांनी ठरवलेली उद्दीष्टे ते वेळेत पूर्ण करतात. आपली प्रगती व्हावी यासाठी आवडत नसलेल्या गोष्टींवरही हे लोक मेहनत घेतात. संथपणे काम करणारे आणि या लोकांच्या पद्धतीने काम न करणाऱ्यांशी ते अजिबात पटवून घेऊ शकत नाहीत.
चौकोनी आकाराची नखे:
हे लोक चिकाटीचे आणि हिमतीचे असतात. हे गुण सर्वोत्तम गुणांपैकी असले तरी गंभीर आणि मेहनती असल्यामुळे हे लोक हट्टी असण्याचीही शक्यता असते. थोडं मोकळेपणाने वागलात आणि लवचिकता ठेवली तर अशा लोकांचे आयुष्य अधिक सुरक होऊ शकते.
त्रिकोणी आकाराची नखं:
या लोकांकडे कायम नवनवीन कल्पना असतात. इतरांकडून सुटलेले बारीकसारीक तपशील या लोकांच्या चटकन लक्षात येतात. हे लोक जास्त सर्जनशील असतातच पण ते संवेदनशीलही असतात. चुकीचे वागणाऱ्या लोकांना या लोकांच्या लेखी अजिबात थारा नसतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.