Keep These Plants In Home Garden: पुण्यात झिका व्हायरसचे रूग्ण आढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. या व्हायरची लक्षणे डेंग्यू आजारासारखी आहे. पावसाळा सुरू होताच डासांची पैदास वाढते. यामुळे अनेक आजार उद्भवतात. या आजारांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही घरच्या बागेत पुढील रोप लावू शकता. ज्यामुळे घरापासून डास दूर राहतील
पावसामुळे साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुणिया यासारखे आजार निर्माण होतात. यामुळे घराभोवती स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. तसेच तज्ज्ञांच्या मते काही रोप लावल्यास डास दूर राहतात.
रोजमेरीचा चहा आरोग्यदायी असतो. तसचे जेवणात देखील याचा वापर केला जातो. याच्या वासामुळे डास पळून जातात. तसेच या रोपाची काळजी घेणे सोपे असते. तुम्ही घरात कंटेनर किंवा भांड्याच सहज वाढवू शकता.
लॅव्हेंडरचा सुगंध अनेक लोकांना आवडतो.तसेच हा सुगंध डासांना दूर ठेवतो. तुम्ही घराभोवती किंवा खिडकीजवळ ठेवल्यास डास दूर राहतात.
लेमन ग्रासमुळे डास दूर राहतात. याला लिंबासारखा वास असतो. त्यामुळे किटक दूर राहतात. घरात किंवा बागेत हे रोप लावू शकता.
झेंडूच्या फूलांचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. तसेच त्याच्या वासांमुळे डास दूर राहतात. डासांना फुलांचा वास आवड नाही. तसेच ही झाडे घराच्या भोवती लावता येतात.
पुदीना सहज कुठेही लागतो. तुम्ही घरातील कुंडीमध्ये देखील हे रोप लावू शकता. त्याचा वापर चटणी किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. पुदीनाच्या सुगंधामुळे डास दूर राहतील.
तुळशीला हिंदु धर्मात खुप महत्व आहे. तुळशीचे रोप अनेकांच्या घरी असते. तुळशीचा वापर औषधांपासून ते अनेक कामांसाठी केला जातो. तुळशीचे रोप ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात सोडते. तसेच डासांना देखील घरापासून दूर ठेवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.