Zinc Rich Foods esakal
लाइफस्टाइल

Zinc Rich Foods : शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी झिंक आहे फायदेशीर,असा करा आहारात समावेश

Zinc Rich Foods : सदृढ शरीरासाठी आपण आहारात जीवनसत्वे, प्रथिने, झिंक आणि इतर खनिजांचा समावेश करणे आवश्यक आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Zinc Rich Foods : निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. या दोन्हींचा योग्य समतोल राखला की, शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते. सदृढ शरीरासाठी आपण आहारात जीवनसत्वे, प्रथिने, झिंक आणि इतर खनिजांचा समावेश करणे आवश्यक आहे.

हे सर्व घटक आपल्या शरीराच्या सर्वांगीण विकास करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. जर या पोषकघटकांची शरीरात कमतरता असेल तर, अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पोषकघटकांपैकी एक असलेले झिंक हे आपल्या शरीराद्वारे संसर्गाशी लढण्यासाठी आणि पेशी तयार करण्यासाठी मदत करतात.

जर शरीरात झिंकची कमतरता निर्माण झाली तर आरोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

दही

दही हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात झिंक आढळून येते. त्यामुळे, शरीरातील झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात दह्याचा समावेश करू शकता. दह्यामध्ये झिंकसोबतच प्रथिने, कॅल्शिअम आणि इतर पोषकघटक असतात. दह्याचे नियमितपणे सेवन केल्यास आपली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे, तर आपल्या सर्वांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा आवर्जून समावेश असतो. झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा. पालक, मेथी, मटार, तांदूळसा इत्यादी भाज्यांमध्ये झिंकसोबतच इतर पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा जरूर समावेश करा.

शेंगदाणे

शेंगदाण्यांचा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे. आहारातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये शेंगदाण्याचा वापर केला जातो. तसेच, शेंगदाण्यांचा वापर करून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.

आरोग्यासाठी फायदेशीर असणारे शेंगदाण्यांना झिंकचा उत्तम स्त्रोत म्हणून ओळखले जाते. या शेंगदाण्यांमध्ये झिंकसोबत लोह, जीवनसत्वे, व्हिटॅमीन ई, पोटॅशिअम आणि फायबरचे भरपूर गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे, शरीराचा विविध आजारांपासून बचाव केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT