Shirur Loksabha  sakal
लोकसभा २०२४

Shirur Loksabha : वाघोलीत ६०,६९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी वाघोलीत ६०,६९४ मतदार सोमवारी ( दि. १३ ) मतदानाचा हक्क बजविणार आहेत. यामध्ये ३३,८१६ पुरुष, २६,८७२ महिला तर ६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदा २३,०५१ मतदार वाढले आहेत. मतदानासाठी यंत्रणा सज्ज होत आहे.          

शिरूर लोक सभा मतदार संघात सुमारे २५ लाख  मतदार आहेत. या मतदार संघात भोसरी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हडपसर, खेड आळंदी हे विधानसभा मतदार संघ येतात. वाघोलीचा समावेश शिरूर विधानसभा मतदार संघात आहे. शिरूर विधानसभा मतदार संघात एकूण ४,२४,०२७ मतदार आहेत.

शिरूर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदार हडपसर विधानसभा मतदार संघात आहेत. त्याची संख्या ५,५१,१५६ आहे. वाघोलीत यंदा सहा मतदार केंद्र आहेत. यामध्ये सातव हायस्कूल, सातव ज्युनिअर कॉलेज,( डि कॅथलॉन समोर ), भारतीय जैन संघटना विद्यालय ( बकोरी फाटा ), जिल्हा परिषद शाळा ( पोस्ट ऑफीस जवळ ), जिल्हा परिषद शाळा, उबाळेनगर, अंगणवाडी ( वाघेश्वर इंग्लीश मेडीयम स्कूल जवळ ) या केंद्राचा समावेश आहे. यासाठी ४५० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

मतदान केंद्र वाढले आले तरी काहींची नावे घरापासून दूर असलेल्या केंद्रात आले आहे. उन्हाचा तडाखा, अवकाळी पावसाचा अंदाज, शाळांना सुट्टी असल्याने गावी गेलेल्या बहुतांश महिला मतदार यामुळे किती टक्के मतदान होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या मतदार संघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव व महविकास आघाडीचे डॉ अमोल कोल्हे यांच्यात प्रमुख लढत आहे. याशिवाय अन्य ३० उमेदवार रिंगणात आहेत.

डॉ कोल्हे विजयाची पुन्हा बाजी मारणार की आढळराव मागील पराभवाचा वचपा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा असेल पोलीसांचा ताफा

लोणीकंद पोलीस ठाणे अंतर्गत एकूण १२९ बूथ आहेत. यामध्ये शिरूर व पुणे लोकसभा मतदार संघातील बुथचा समावेश आहे. या बूथ साठी एक सहायक पोलीस आयुक्त, दोन पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व सुमारे २५० पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिली.

दुकाने बंद राहणार

मतदान केंद्र परिसरातील सर्व व्यावसाय सोमवारी बंद  ठेवावे लागणार आहेत. तसेच केंद्राच्या १०० मीटर आत मतदार वगळता इतराना प्रवेश दिला जाणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT