Belgaum Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

Belgaum Lok Sabha : बेळगावात 72 टक्के, तर चिक्कोडीत विक्रमी 78.63 टक्के मतदान; वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार?

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील १३ उमेदवारांचे भवितव्य काल (ता. ७) मतदार यंत्रणेत बंद झाले.

सकाळ डिजिटल टीम

चिक्कोडी-सदलगा मतदारसंघातील एकसंबा येथे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यमकनमर्डी मतदारसंघातील जुने वंटमुरी येथे प्रियंका जारकीहोळी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील (Belgaum Lok Sabha Constituency) १३ उमेदवारांचे भवितव्य आज (ता. ७) मतदार यंत्रणेत बंद झाले. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ७१.४९ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये ६६.५९ टक्के मतदानाची नोंद होती. यावेळी चार टक्के वाढीव मतदानाची नोंद झाली आहे. यामुळे वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आहे, हे चार जून रोजी निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

बेळगाव आणि चिक्‍कोडी लोकसभा (Chikkodi Lok Sabha) मतदारसंघात सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण राज्यात चिक्कोडी मतदारसंघात विक्रमी ७८.६३ टक्के इतके मतदान झाले. मतदान जागृतीला व्यापक प्रतिसाद मिळाल्यामुळे बेळगावसह चिक्कोडीत गतवेळ निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झाल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही भागांत मतदार यादीत नावे गायब, तांत्रिक बिघाड आणि अन्य किरकोळ स्वरूपाची तक्रारी वगळता सर्वत्र सुरळीत आणि शांततेत मतदान झाले. त्यामुळे बेळगाव आणि चिक्कोडी दोन्ही ठिकाणी चांगले मतदान झाले आहे. त्यात बेळगाव ग्रामीणला सर्वाधिक ७६.८७ टक्के मतदान झाले आहे, तर सर्वात कमी बेळगाव उत्तर ६३.४२ टक्के मतदान झाले आहे. बेळगाव दक्षिणला ६६.५२ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. सौंदत्तीमध्ये ७६.७३, रामदुर्ग ७३.६ टक्के, बैलहोंगल ७३.५ टक्के, आरभावी ७१.९२ टक्के, गोकाक ७१.०६ टक्के मतदान झाले आहे.

बेळगावला १३ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांचे भवितव्य आज मतदान यंत्रणात बंद झाले आहे. मात्र, यात खरी लढत तिघा उमेदवारांत आहे. भाजप उमेदवार जगदीश शेट्टर, काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांच्यामध्ये आहे. भाजप उमेदवार याच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींसह माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या. काँग्रेस उमेदवार हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारसह नेत्यांनी सभा घेतल्या.

Chikkodi Lok Sabha

म. ए. समिती उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचारार्थ म. ए. समिती नेत्यांसह मराठा आरक्षणासाठी लढा देणार, मनोज जरांगे यांनी सभा घेतल्या. त्याशिवाय अपक्षांनीही मोठ्या स्वरूपात सभा घेतल्या. बेळगाव जिल्ह्यामधील तिरंगी लढतीने बेळगावसह सीमाभाग चांगला ढवळून निघाला. उमेदवारांचे भवितव्य यंत्रणात बंद झाल्यामुळे मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, त्याची औत्सुक्यता वाढली आहे. ४ जून रोजी निकाल घोषित होणार आहे.

बेळगाव जिल्ह्यात २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत चिक्कोडीत ७५.५२ टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या मतदान दरम्यान ७८.५१ टक्के मतदानाची नोंद आहे. यामुळे ३ टक्के मतदान टक्केवारी वाढली आहे. बेळगाव मतदारसंघात २०१९ मध्ये ६७.७० टक्के मतदान झाल्याची नोंद होती, तर आज झालेल्या मतदान दरम्यान ४ टक्के अधिक मतदान झाले असून, ७१.४९ टक्के मतदानाची नोंद आहे.

-नीतेश पाटील, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी.

जिल्ह्यात ७५ टक्के

बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ७४.८७ टक्के मतदान झाले आहे. यात चिक्कोडी मतदारसंघात ७८.५१ टक्के, बेळगाव ७१.४९ आणि कारवार लोकसभा मतदारसंघाशी जोडण्यात आलेल्या खानापूर मतदारसंघात ७३.८७ टक्के व कित्तूर मतदारसंघात ७६.२५ टक्के मतदान झाले आहे.

Chikkodi Lok Sabha

‘चिक्कोडी’त विक्रमी सर्वाधिक ७९ टक्के

चिक्कोडी : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का कमी गणला जातो. पण, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळी सातपर्यंत विक्रमी ७८.६३ टक्के मतदान झाले. सकाळी सातपासून सुरू झालेले चुरशीचे मतदान संध्याकाळी सातनंतरही सुरू होते.

चिक्कोडी मतदारसंघातील १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य मशीनबंद झाले. भाजपकडून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले, काँग्रेसकडून मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका जारकीहोळी व अपक्ष म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी शंभू कल्लोळकर यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. अपक्ष उमेदवार किती मतदान घेणार आणि त्यांचा कुणाच्या जय-पराजयाला उपयोग होणार, हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.

सकाळी सातपासून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात मतदानाला चुरशीनेच प्रारंभ झाला. दुपारी उन्हं असल्याने सकाळी गर्दी झाल्याचे वाटत असताना दुपारीही सर्व केंद्रांवर गर्दी कायम दिसून आली. अपवाद वगळता सर्वच केंद्रांवर दुपारीही निवडणूक कर्मचाऱ्यांना निरंतर काम करावे लागले. प्रत्येक मतदान केंद्रांवर मंडप उभारले होते, पण घामाच्या धारा वाहत लोक मतदानासाठी उत्साही होते. त्यातून संध्याकाळपर्यंत मतदानाचा टक्का वाढत गेला. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे हे कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहावे लागेल.

चिक्कोडी-सदलगा मतदारसघातील एकसंबा येथे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यमकनमर्डी मतदारसंघातील जुने वंटमुरी येथे प्रियंका जारकीहोळी यांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील सर्व दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क सकाळीच बजावून इतरत्र मतदारसंघातील आढावा घेत दौरे करत होते. निपाणी, चिक्कोडी-सदलगा, कुडची, रायबाग, कागवाड, अथणी, हुक्केरी व यमकनमर्डी मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. सर्वच मतदान केंद्रांत दिवसभर चुरशीने मतदान झाले. निपाणी मतदारसंघात सोमवारी रात्रीपर्यंत राजकीय उलथापालथी सुरू होत्या. त्यामुळे मंगळवारी दिवसभर या मतदारसंघावर विशेष लक्ष दिसून आले. कुठल्याही मतदारसंघात गोंधळ न होता मतदान शांततेत पार पडले.

गतवेळेपेक्षा वाढला टक्का

सर्वत्र उन्हाचा कडाका असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचे चित्र एका बाजूला राज्यातील सर्व मतदारसंघात असताना चिक्कोडी मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. गेल्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी ७५.५२ टक्के मतदान झाले होते. यंदा तीन टक्के मतदान वाढले असून, ते कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहावे लागेल.

उष्णतेच्या लाटेतही उत्साह

अथणी तालुक्यामध्ये किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. उन्हाचा तडाका असूनही सर्वच मतदान केंद्रांवर रांगेत उभे राहून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे बाहेर गावी नोकरी व इतर कामांसाठी असलेले मतदारही मतदानासाठी आले होते. संध्याकाळी सहापर्यंत बाहेरगावचे मतदार येऊन मतदान करत होते.

मतदारसंघनिहाय झालेले मतदान

  • निपाणी ७९.९८

  • चिक्कोडी-सदलगा ७९.५९

  • रायबाग ७६.०२

  • कुडची ७५.०३

  • कागवाड ७८.९५

  • अथणी ७८.३७

  • हुक्केरी ७८.३८

  • यमकनमर्डी ८२.२१

  • एकूण ७८.६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT