Lok Sabha seat-tamilnadu esakal
लोकसभा २०२४

किस्से निवडणुकीचे! लोकसभेत एका जागेसाठी ९० अर्ज, निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली होती झोप

Sandip Kapde

lok sabha election: लोकसभा निवडणूक म्हटली की सगळ्यात जास्त उमेदवारांची धावपळ असते, तिकीट मिळवण्यासाठी चक्क भांडण देखील होतात तर काही पक्षांना उमेदवार देखील मिळत नाही पण तुम्हाला माहिती आहे का एक असा मतदारसंघ आहे जिथे उमेदवारांनी नाईन्टी मारली होती...थोड थांबा आधी गैरसमज दूर करा..

उमेदवारांनी नाईन्टी मारली होती म्हणजे एका जागेवर ९० जणांनी अर्ज भरले होते. आता श्वास सोडा आणि किस्सा ऐका....

EVM चा वापर सुरू होण्याआधीचा हा किस्सा आहे. तमिळनाडूमधील मदुरांतकम् मतदारसंघात १९८४ च्या निवडणुकीत ९० जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या मतदारसंघात द्रमुक आणि काँग्रेस या तगड्या पक्षांचे उमेदवार रिंगणात होते आणि खरी लढत त्यांच्यातच होती. तरीही ९० जणांनी अर्ज भरल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावाला...

अर्ज भरलेल्या ९० उमेदवारांपैकी ८७ जण अपक्ष होते.  निवडणूक आयोगाने तमिळनाडूसाठी २५ निवडणूक चिन्हे दिली होती. त्यामुळे या ८७ उमेदवारांमध्ये २५ निवडणूक चिन्हांचे वाटप कसे करायचं, बॅलेट पेपरवर इतकी नावे चिन्हांसह बसवायचे, याचा विचार करुन अधिकाऱ्यांची झोप उडाली होती... बरं अपक्ष अर्ज दाखल केलेले कोणीही राजकीय नेते नव्हते तर कोणी भूमिहिन मजूर, रिक्षाचालक, दुकानदार होते.

मात्र निवडणूक आयोगाने तोडगा काढला. ऐनवेळी गाजर, भोपळा, टेबल, खुर्ची अशी निवडणूक चिन्हे मंजूर करवून घेत त्यांचे वाटप करण्यात आले. तर मतपेट्या मोठ्या आकाराच्या बनवल्या...आता थोड थांबा अन् नंतर हसा...कारण निवडणूक अधिकारी चिंतामुक्त झाल्यानंतर अपक्ष उमेदवारांनी गेम केला. ८७ पैकी ८४ जणांनी अर्ज माघारी घेतले.

अर्थात, यामुळे मत विभागणीच्या शक्यतेने धास्तावलेल्या द्रमुक आणि काँग्रेसने सुटकेचा निःश्वास सोडला. या निवडणुकीत द्रमुकचे सी. अरुमुगम विजयी झाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT