धुळे: अयोध्येत साकारलेल्या श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. मात्र, मतपेढीच्या भीतीमुळे ते उपस्थित नव्हते. आम्हाला मात्र तशी भीती नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गांधी, ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ‘‘हिंदुत्वावरून पाच प्रश्नांद्वारे ठाकरे यांना खुले आव्हान देत शहा यांनी देशहितासाठी नरेंद्र मोदी यांना सत्ता द्यावी,’’ महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप- महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ खानदेश गो- शाळेच्या मैदानावर सोमवार दुपारी दीडनंतर शहा यांची सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, आमदार अमरिशभाई पटेल, जयकुमार रावल, दिलीप बोरसे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, मनसेचे जयप्रकाश बाविस्कर, राहुल आहेर, शशिकांत वाघ, भाजपचे निवडणूक समन्वयक राजवर्धन कदमबांडे, गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी पाच प्रश्नांची उत्तरे द्यावीत
दहशतवादी कसाबचे समर्थन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांबरोबर राहणार का?
‘मुस्लिम पर्सनल लॉ’ पुन्हा आणू पाहणाऱ्या काँग्रेसबरोबर आहात का?
वीर सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेस, राहुल गांधींच्या भूमिकेशी सहमत आहात का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आहुती दिली आणि याविरोधी भूमिका असणाऱ्यांशी हातमिळवणी करून सनातन धर्माला विरोध करणार का?
कोरोनाच्या संकटकाळात मोफत लस देणाऱ्या मोदी यांच्याप्रमाणे राहुल गांधी देशाला वाचवू शकतील?
अमित शहा म्हणाले...
देशात ७० वर्षे काँग्रेसने, नंतर त्यांच्या सरकारमध्ये सहभागी शरद पवार यांनी श्रीराम मंदिराचा प्रश्न लटकत ठेवला
मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर श्रीराम मंदिरासंबंधी याचिका जिंकली, अयोध्येत भूमिपूजन केले आणि यंदा २२ जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली
दहशतवाद, नक्षलवाद संपुष्टात आणणारे काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य होता की नव्हता हे ठाकरे यांनी नैतिकेतून सांगावे
मोदी, गांधींमध्ये तुलना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांचे नाव घेणे सोडले आहे, त्या वीर सावरकरांना प्रणाम करतो, असे म्हणत शहा यांनी भाषणाला सुरुवात केले. ते म्हणाले, की एकीकडे १२ लाख कोटींचा गैरव्यवहार करणारे राहुल गांधी यांचे काँग्रेस व मित्र पक्ष तर २३ वर्षे मुख्यमंत्री, पंतप्रधानपदी राहूनही २५ पैशांचा आरोप नसलेले नरेंद्र मोदी, तापमान वाढताच बँकॉक, थायलंडला सुटीसाठी जाणारे राहुल गांधी आणि चुकून दिवाळीची सुटी घेतलीच तर ती जवानांसोबत घालवणारे नरेंद्र मोदी, चांदीच्या चमचा तोंडात घेऊन जन्मलेले राहुल गांधी आणि चहा विक्रेत्याच्या घरात जन्मलेले नरेंद्र मोदी यापैकी कुणाची निवड करावी हे मतदारांनी ठरवावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.