Amol Kolhe sakal
लोकसभा २०२४

Amol Kolhe : विधानसभा बाकी आहे, जवाब मिलेगा : कोल्हे

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : ‘‘शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे, करारा जवाब मिलेगा। आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल,’’ या शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिले.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सांगता सभा नारायणगावात भरपावसात झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती, तेव्हा स्वार्थासाठी सरटणाऱ्यांच्या रांगेत जायचं नाही हे ठरवलं होतं. उपमुख्यमंत्र्यांना १२ सभा घ्याव्या लागत असतील, तर हा माझा गौरव आहे. ’’

अमोल कोल्हे म्हणाले...

  • कडेवर घेतलेल्या उमेदवाराच्या प्रचारात पालकमंत्री व्यग्र आहेत.

  • प्रचारातून बाहेर या आणि बिबट्याच्या प्रश्नांवर लक्ष द्या नाही.

  • बिबट्याचा प्रश्न हा माझ्या माणसांसाठी गंभीर प्रश्न आहे.

  • कितीही नोटिसा पाठवल्या तरी प्रश्न विचारत राहणार

सभेत दाखवली नोटीस

शिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेत आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयी कसे प्रश्न विचारत होते, हे डॉ. कोल्हे यांनी पुराव्यांसह दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडून डॉ. कोल्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस जाहीर सभेत दाखवत, कितीही नोटीस आल्या तरी त्याचा विचार करत नाही, कारण प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. जनहिताचे, लोकशाहीचे प्रश्न विचारत राहणार, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT