लोकसभा २०२४

Anandraj Ambedkar : आनंदराज आंबेडकरांनी आणखी निर्णय बदलला; 'वंचित'च्या पाठिंब्यावर...

सकाळ वृत्तसेवा

Lok sabha election 2024 : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा आपला निर्णय बदलविला आहे. आता आपण ही लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे पत्रपरिषदेत त्यांनी रविवारी जाहीर केले.

मागील दोन दिवसांपासून आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारी संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. आनंदराज आंबेडकर यांनी सुरुवातीला लोकसभेकरिता अर्ज दाखल केला. मात्र याच दरम्यान वंचित आघाडीने दुसरा उमेदवार जाहीर केला. त्यामुळे नाराज आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला.

परंतु रिपल्बिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरला तर अनेकांनी आपल्याला गळ घातल्याने आपण ही निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. अमरावती राखीव मतदारसंघात आंबेडकरी विचारधारेचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या असून आपल्या रूपाने आंबेडकरी जनतेला एक सशक्त पर्याय उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला.

रिपब्लिकन सेना तसेच वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो समन्वय असून लवकरच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा प्रचारदौरा आयोजित करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई येथील इंदू मिलची जागा बिल्डरांच्या घशातून काढण्यासाठी आपणच प्रयत्न केले होते आणि आज इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या अनुयायांच्या ताब्यात असल्याचे सांगत आपण तळागाळातील कार्यकर्ते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमरावती लोकसभेतील मतदार आता बदल्याच्या मूडमध्ये असून आपण इतर सर्व उमेदवारांवर मात करून विजयी होणार, असा दावा आनंदराज आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT