Baramati Loksabha Result sakal
लोकसभा २०२४

Baramati Loksabha Result : नेटक्या यंत्रणेने केलेल्या प्रचाराला यश

राजेंद्रकृष्ण कापसे

बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा समजला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात येथे मताधिक्यासाठी मोठी चुरस होती. दोन्ही बाजुंनी सुमारे एक लाखाचे मताधिक्य मिळवण्याचे ध्येय होते. मात्र, सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघात २० हजार‌ ७४६ चे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात ५ लाख ३८ मतदार आहेत. त्यातील ५१.५५ टक्के म्हणजे २ लाख ७७ हजार ३६५ मतदारांनी मतदान केले. त्यात सुनेत्रा पवार यांना १ लाख ४१ हजार ९२८ तर, सुप्रिया सुळे यांना एक लाख २१ हजार १८२ मतदान झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सहा माजी नगरसेवक, दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंचायत समितीचे माजी सदस्य होते. त्यांच्यासह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचे जाळे सोबत होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे १० माजी नगरसेवक, त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भाजपचे १६ माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य होते.

तसेच जिल्हा बँकेचे संचालक, बाजार समितीचे संचालक, पंचायत समितीचे माजी सदस्य यांची कुमकही त्यांच्यासमवेत होती. सुळे यांनी गेल्या निवडणुकीतील विरोधी उमेदवाराचे ६५ हजारांचे मताधिक्य यंदा सुमारे २१ हजारांवर आणले, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब ठरली. तर, सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी ६५ हजारांचे मताधिक्य एक लाखापेक्षा जास्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

मात्र, मित्रपक्षाची मोठी मजबूत फळी असतानाही त्यांना ते गाठता आले नाही. सुनेत्रा पवार यांना कोथरूड, बावधन, वारजे, सिंहगड रस्ता, धनकवडी, बालाजीनगर, कात्रज, नांदेड, डीएसके, धायरी नऱ्हे परिसरातून आघाडी मिळाली तर, सुप्रिया सुळे यांना कात्रज, बालाजीनगर, चैतन्यनगर, धनकवडीचा काही भाग, आंबेगाव, तसेच खडकवासला, नांदोशी, किरकटवाडी, सिंहगड रस्ता ग्रामीण, शिवणे ग्रामीण, उजवी भुसारी कॉलनी, बावधनचा काही भाग, खेड शिवापूर, शिवगंगा खोरे येथून चांगले मतदान झाले.

या मतदारसंघात कागदावर महायुतीची ताकद जास्त वाटत होती. परंतु, महाविकास आघाडीच्या नेटक्या प्रचारापुढे महायुतीची ताकद अयशस्वी ठरली. खडकवासल्यामध्ये २००९ पासून लोकसभेतील विजयी उमेदवार आणि विधानसभेचा विजयी उमेदवार हे कधीच एका पक्षाचे नव्हते. तसेच दोन्ही विजयी उमेदवारांचे मताधिक्यदेखील कधीच एकसारखे नव्हते. गेल्या विधानसभा निवडणुकीत तापकीर हे थोडक्या मतांनी निवडून आले होते. घटलेल्या मताधिक्यामुळे भाजपला या मतदारसंघात आणखी तयारी करावी लागेल तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा मतदारसंघ आवाक्यात येऊ शकतो, असा विश्‍वास निर्माण झाला आहे.

मतदारसंघातील प्रश्‍न

  • राष्ट्रीय बाह्यवळण महामार्ग जात असल्याने वाहतूक कोंडी, अपघात

  • शहरी भागात सर्वसामान्यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना

  • समाविष्ट गावांत पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न

  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पुरेशी नाही

  • समाविष्ट गावातील बांधकामे आणि त्यांची कररचना

  • ‘एनडीए’लगतच्या बांधकामाची उंची वाढविणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT