Shrirang Barne  sakal
लोकसभा २०२४

Shrirang Barne : बारणेंच्या विजयाने शिवसेनेला बळ

सकाळ वृत्तसेवा

मागील निवडणुकीत सव्‍वादोन लाख १५ हजार ९१३ मतांचे मताधिक्‍य घेणाऱ्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे यंदाच्‍या निवडणुकीत मताधिक्‍य घटले आहे. मागील वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तगडे आव्हान असतानाही बारणे यांनी अधिक मताधिक्‍य घेतले होते. मात्र, यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्‍या संजोग वाघेरे यांचे विशेष आव्‍हान नसतानाही शिवसेनेचे बारणे यांचा केवळ ९६ हजारांच्‍या मतांनी विजय झाला आहे.

बारणे यांच्या विजयामुळे शिवसेेनचे अस्तित्व जिल्ह्यात कायम राहण्यास मदत झाली आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर या मतदारसंघात त्यांच्यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अाव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोणती शिवसेना राहणार याचा फैसला या निवडणुकीमध्ये होणार होता.

त्यामुळे आजी-माजी शिवसैनिकांसाठी हा निकाल महत्त्वाचा होता. त्यात शिवसेनेने बाजी मारली. २०१४ च्‍या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार असलेल्‍या बारणे यांच्यापुढे शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्यावर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांचे आव्‍हान होते. या निवडणुकीत खरी लढत ही बारणे आणि जगताप यांच्‍यात झाली.

यामध्ये १ लाख ५७ हजार ३९७ इतक्या मताधिक्‍क्‍यांनी खासदार बारणे यांनी विजय मिळविला.मागील निवडणुकीच्‍या तुलनेत यंदा बारणे यांना तगडे आव्‍हान नव्‍हते. संपूर्ण मतदारसंघासाठी संजोग वाघेरे हे नवीन चेहरा होते. सुरूवातीला बारणे यांच्‍या विरोधात नाराजी असल्‍याचा तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्‍याबद्दल असलेल्या सहानुभूतीचा फायदा वाघेरे यांना होईल, असे चित्र रंगविण्यात आले. मात्र, नेहमीसारखा उलटा अंदाज झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT