bajarang sonawane pankaja munde esakal
लोकसभा २०२४

Pankaja Munde : ''मला माझ्या प्रयत्नांवर विश्वास आहे, पण...'' प्रचार थांबल्यानंतर पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

संतोष कानडे

Beed Loksabha election 2024 : बीड लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी चुरस बघायला मिळत आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि उमेदवार पंकजा मुंडे यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलं की, निकाल आपल्या हातात नसतो परंतु प्रयत्नांवर माझा विश्वास आहे. आम्ही शंभर टक्के प्रयत्न केले असून यश नक्कीच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोमवार, दि. १३ मे रोजी बीडसह राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी या मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात तगडी फाईट झाल्याचं बघायला मिळालं.

रविवारी 'एबीपी माझा'शी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, निवडणुकीमध्ये मी आणि माझ्या टीमने अथक परिश्रम घेतले आहेत. निकाल आपल्या हातात नसतो परंतु प्रयत्नांवर माझा विश्वास आहे. आम्ही ४५ दिवस प्रचारात व्यस्त होते.. यावेळी हसत-खेळत प्रचार पार पडला.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, आमच्या परिश्रमामध्ये लोकांनी योगदान दिलं की मोहीम फत्ते होईल. धनंजय मुंडे आणि मी २००९ मध्ये लोकसभेला एकत्रित काम केलं होतं. त्यानंतर २०२४ मध्ये आम्ही पुन्हा एकत्र आलो. मधल्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आपलंच माणूस वाईट बोलतंय म्हटल्यावर टोचणी असायची. परंतु आता रिलॅक्स वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT