लोकसभा २०२४

Beed Lok Sabha Election 2024 : गलती से मिस्टेक हो गया... 'तुतारी'ऐवजी 'पिपाणी'चं बटन दाबल्याने सोनवणेंची लीड 55 हजारांनी घटली

दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा

Marathwada Lok sabha election result 2024 : चिन्हातील साधर्म्यामुळे बहुजन महा पार्टीच्या पिपाणी चिन्हाला भरुपूर मते पडली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात बजरंग सोनवणे यांच्या तुतारीचे टेन्शन चांगलेच वाढले. अशोक थोरात यांच्या पिपाणी चिन्हावर झालेले मतदान वंचित बहुजन आघाडीच्या अशोक हिंगे यांच्या मतदानापेक्षा अधिक आहे. त्यांना ५५ हजारांहून अधिक मते पडली. तर, वंचितला ५० हजारांहून अधिक मते पडली.

बीड लोकसभा मतदार संघात भाजपच्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात घासून आणि ठासून झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. या दोन प्रमुख उमेदवारांसह वंचितकडून अशोक हिंगे तसेच बहुजन महा पार्टी पक्षाकडून अशोक थोरात रिंगणात होते.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक ४१ उमेदवार आणि एक नोटा असे ४२ उमेदवार झाले. त्यामुळे तीन मतदान यंत्र केंद्रांत बसवावे लागले. प्रमुख उमेदवार पंकजा मुंडे यांचे चिन्ह पहिल्या मशिनच्या पहिल्या क्रमांकावर होते. तर, बजरंग सोनवणे यांचे चिन्हा दुसऱ्या क्रमांकावर होते. पहिल्याच मशिनवर चौथ्या क्रमांकावर अशोक थोरात यांचे पिपाणी हे चिन्ह होते.

ग्रामीण भागात तुतारी व पिपाणी यात फरक कळला नसल्याचे दिसते. त्यामुळे पिपाणी चिन्हावरही भरभरुन मतदान झाल्याचे मतमोजणीच्या आकड्यांवरुन समोर आले आहे. शेवटच्या टप्प्यात पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांचे मतदान जवळपास सारखे होते. त्याच वेळी थोरात यांचे मतदान ५० हजारांच्या पुढे गेले होते. म्हणजेच ग्रामीण भागातील अशिक्षीत तसेच वृद्धांनी तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हाशी सामधर्म्य असलेल्या पिपाणीवरही मतदान केल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे वंचितच्या अशोक हिंगे यांच्यापेक्षा पिपाणी चिन्हाला अधिक मते मिळाली आहेत.

एकूण ३२ फेऱ्यांतील ३१ फेऱ्यांपर्यंत पिपाणीने ५४ हजार ६४८ मते घेतली होती. तर, वंचितच्या अशोक हिंगे यांनी ५० हजार ७०६ मते घेतली. या फेरीत बजरंग सोनवणेंना सहा लाख ८० हजार १५६ तर पंकजा मुंडे यांना सहा लाख ७४ हजार २८ मते होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT