Uddhav Thackeray Sangli Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : 'मला सांगली ओरबडायची नाही, पण..'; जाहीर सभेत कोणाला उद्देशून म्हणाले उद्धव ठाकरे?

आघाडी धर्म म्हणून शिवसेनेने (Shiv Sena) काँग्रेससाठी महाराष्ट्रातील अनेक जागा सोडल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

''शिवसेना फोडली, ती कमी पडली म्हणून राष्ट्रवादी ही फोडली. आता महाराष्ट्राची जनता कधीही मान्य करणार नाही.''

सांगली : आघाडी धर्म म्हणून शिवसेनेने (Shiv Sena) काँग्रेससाठी महाराष्ट्रातील अनेक जागा सोडल्या आहेत. काँग्रेसही सांगलीत आघाडी धर्म पाळेल. मला सांगली ओरबडायची नाही. मी इथे चंद्रहार पाटील यांना खासदार म्हणून पाठवणारच, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी येथे व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रथमच सांगली शहरात जाहीर सभा झाली.

विश्रामबाग येथील नेमीनाथनगरातील कल्पद्रुम क्रीडांगवणार झालेल्या सभेला मोठी गर्दी होती. सांगली लोकसभा निवडणुकीतील (Sangli Lok Sabha) उमेदवारीच्या घोळानंतर आज प्रथमच काँग्रेसचे (Congress) नेते विश्‍वजित कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रथमच एका व्यासपीठावर उपस्‍थित होते. दोघांमध्ये झडलेल्या शाब्दिक चकमकीची सभेनंतरही चर्चा सुरू होती. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut), मिलिंद नार्वेकर, नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय बजाज, ‘डीपीआय’चे सुकुमार कांबळे, संजय पवार, अभिजित पाटील, संजय विभूते, बजरंग पाटील, शंभूराज काटकर, शकील पिरजादे आदी उपस्थित होते.

श्री ठाकरे म्हणाले, ‘आम्ही सांगलीत आलो ते महाआघाडीचा धर्म म्हणून. कोल्हापूर, नांदेड, रामटेक, अमरावती अशा अनेकवार जिंकलेल्या जागा आम्ही आघाडीधर्म म्हणून सोडल्या. तेथे आमचे शिवसैनिक ताकदीने आपला उमेदवार म्हणून काम करीत आहेत. इथेही विश्‍वजित तुम्ही लढला असता, तर नक्की आम्ही ही जागाही सोडली असती. आघाडीत देवघेव होत असते. शिवसेनेने केलेल्या त्यागाची जाणीव आघाडीतील सर्व कार्यकत्यांनी ठेवावी. मला इथून चंद्रहारला खासदार करायचे आहे. ते मी करणारच. मी लढतोय ते महाराष्ट्रासाठी उद्या चंद्रहारही विश्वजित कदम होते म्हणून निवडून आलो असे सांगणार आहेत. हाच आघाडी धर्म आहे. भविष्यात इथे शिवसेना कोठेही आड येणार नाही.’

जयंत पाटील म्हणाले, ‘राज्यात लोकभावना भाजपविरोधात आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा सुरू होताच राज्यातील वारे पूर्णपणे फिरले असून, मराठी माणसाने पक्षफोड्या भाजपला धडा शिकवण्यासाठी निर्णय घेतला आहे. सर्वत्र महाविकास आघाडीचे काम एकमुखी सुरू आहे. मात्र, सांगलीत तसे झाले नाही. जागा वाटप प्रत्येक पक्षाचा निर्णय होता. भाजपला जर हरवायचे असेल, तर आता लढाईची दिशा बदलून चालणार नाही. आपण ताकदीने चंद्रहार पाटील यांचेच काम करायला पाहिजे. विवेकबुद्धी जागृत ठेवून काम केले पाहिजे.

शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा उमेदवार लोकसभेत गेला पाहिजे. इथे मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की, स्टेजवर एक आणि खाली एक असे चालणार नाही. राष्ट्रवादीतील लोकांना शिवसेनेचे काम करायचे तरच पक्षात राहायचे; अन्यथा माझा राम राम. माझी सोशल मीडियावरून बदनामी सुरू आहे. मी आज पुन्हा तिसऱ्यांदा सांगतो की सांगलीच्या निर्णयात माझा काहीही सहभाग नाही. उद्धवजी हे तुम्हीच सर्वांना सांगा.

विश्वजित कदम म्हणाले, ‘अनेक राजकीय संकटात मी केवळ टिकलो आहे ते काँग्रेस विचारधारा जपणाऱ्या लोकांमुळे. आर. आर. आबा, पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदनभाऊंसारखे लोक गेले आणि आमच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आली. २०१९ ला इतिहास घडला फसव्या राजकारणाविरोधात उद्धवजी तुमच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. महात्मा फुलेंच्या नावाने कर्ज माफी दिलीत, कोरोना काळात सर्वांत चांगले काम केले, विकास आजचा उद्या होईल, पण लोक जगले पाहिजेत ही भूमिका घेतली. पण शिवसेना फोडली, ती कमी पडली म्हणून राष्ट्रवादी ही फोडली. आता महाराष्ट्राची जनता कधीही मान्य करणार नाही. आम्हाला ही लोकभावनेची लाट स्पष्ट दिसतेय. सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा नैसर्गिक हक्क आहे. आमच्या पक्षानेही मला तशी आशा दाखवली होती; पण आमची निराशा झाली.’

चंद्रहार पाटील म्हणाले, ‘माझ्यावर बोलण्यासारखे काही नाही, म्हणून मला नवखा आहे, माझे योगदान काय, असे विचारतात, २००७ साली जयंतराव पाटील, आरआर आबा आणि दिवंगत अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मी वयाच्या बावीसाव्या वर्षी मी जिल्हा परिषद सदस्य झालो. ३५ वर्षांनी मी पहिल्यांदा डबल महाराष्ट्र केसरीचा मान या जिल्ह्याला मिळवून दिला आहे.’

सांगलीच्या जागावाटपात माझा काहीही संबंध नाही हे पुन्हा एकदा मी जाहीरपणे सांगतो. आता सर्वांनी आघाडीधर्म पाळावा. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माझे सांगणे आहे की स्टेजवर आणि स्टेजखाली एक चालणार नाही. नाही तर आताच रामराम घ्या. अपक्षांचा कधीही भरवसा नसतो, हे आम्ही नवनीत राणांबाबतीत पाहिले आहे. महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. त्यांच्याच विचाराचा खासदार दिल्लीला पाठवा.’

-जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

चंद्रहार कुस्तीचा फड वेगळा, राजकीय फड वेगळा, इथे तयारीचाच पैलवानचं पाहिजे. मी कधीही तुमच्याविरोधात भूमिका मांडली नाही. मी आमच्या पक्षाची भूमिका मांडत होतो. आम्ही इथे पक्षाचे निष्‍ठावान कार्यकर्ते आहोत. आम्ही महाविकास आघाडीचा हा संयुक्त निर्णय मान्य करतो. उमेदवाराने कष्ट घ्यावेत, मित्रपक्षाने देखील कष्ट घ्यावेत. उद्धवसाहेब तुम्ही महाराष्ट्राचे तर, आम्ही सांगलीचे वाघ आहोत. आम्ही तुम्हाला आमचे काम दाखवून देऊ.

-विश्‍वजित कदम, माजी मंत्री

तुम्ही विधानसभेला मदनभाऊंचा, पृथ्वीराज पाटील यांचा केलेला पराभव सर्वज्ञात आहे. काँग्रेसचे नाव घेऊन बंडखोरी करता. तुम्ही वसंतदादांना बदनाम करता. कारण तुम्ही भाजपचे पाकीट घेऊन बी टीम म्हणून काम करीत आहात. म्हणूनच नियतीने तुम्हाला तेच चिन्ह दिलेय. संजयकाकांनी ऊस बिल बुडवून तासगावची बदनामी केली आहे. सहकारी संस्था बुडवल्या आहेत. तुम्हा दोघा बुडव्या कारखानदारांविरोधात शेतकऱ्यांच्या मुलाची ही उमेदवारी आहे.

-चंद्रहार पाटील, महाआघाडीचे उमेदवार

उद्धव ठाकरे यांचे भाषण

  • एकूण वेळ- २० मिनिटे

  • एनडीएवर टीका - ६ मिनिटे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका- ५ मिनिटे

  • स्थानिक उमेदवारीबाबत भाष्य- ५ मिनिटे

  • राज्यातील कामगिरीबाबत- २ मिनिटे

  • इंडिया आघाडीच्या भूमिकेबाबत- २ मिनिटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT