BJP Changed Five States e sakal
लोकसभा २०२४

BJP Big Loss Five States: भाजपची 400 पारची घोषणा ठरली फेल! 'या' पाच राज्यांनी केला गेम

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काळजीवाहू पंतप्रधान मोदींनी चारशेपारची घोषणा केली खरी पण ती सत्यात उतरवणं तर दूरच पण तिथपर्यंत पोहोचताना भाजपची पूर्ण दमछाक झाली. याला कारणीभूत ठरले देशातील पाच राज्ये. या पाच राज्यांमध्ये कमी झालेल्या जागांमुळं बहुमत मिळवूनही मोठ्या पराभवाचा सामना भाजपला करावा लागला आहे. जाणून घेऊयात भाजपचा अपेक्षा भंग करणारी राज्ये कोणती? अन् तिथं भाजपची कामगिरी कशी राहिली? (BJP big loss in five states Maharashtra Uttar Pradesh Rajsthan Haryana West Bengal Karnataka)

उत्तर प्रदेश -

सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत येण्यास उत्तर प्रदेशचा मोठा वाटा राहिला. या राज्यातून 80 पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये (२०१९) त्यात ९ जागांची घट होऊन ६२ जागा भाजपला मिळाल्या. त्यानंतर हा स्कोअर वाढवण्यासाठी राम मंदिराची उभारणी हा महत्वाचा भाग ठरणार असं वाटत असतानाच तो केवळ आभास ठरला. कारण राम मंदिराचं भव्यदिव्य उद्घाटन करुनही भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मानहानीकारण म्हणजेच केवळ ३३ जागाच मिळवता आल्या अन् इथंच भाजपचं चारशे पारचं स्वप्न भंगलं.

महाराष्ट्र -

महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपला मोदी लाटेमुळं २३ इतक्या जागा मिळाल्या होत्या. त्यानतंर २०२९ मध्ये शिवसेनेच्यासाथीनं महाराष्ट्रात युतीचे ४३ खासदार निवडून आले होते. यामध्ये भाजपच्या २३ तर शिवसेनेच्या १८ जागा होत्या. या सलग दोन टर्ममधला परफॉर्मन्स पाहता यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फुटलेली शिवसेना बरोबर असली तरी मोदींच्या जीवावर आपण ४५ पार करु असा ओव्हर कॉन्फिडन्स भाजपला होता. पण निवडणुकीचे निकाल येताच त्यांची पूर्णपणे वाताहात झाली अन् भाजपला २८ पैकी केवळ ९ जागाच मिळाल्या आणि शिंदेंच्या शिवसेनेला ७ जागा मिळाल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. अशा प्रकारे एनडीएला १७ जागा मिळाल्या आणि उर्वरित ३१ जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. २०१९ च्या तुलनेत भाजपला इथं १४ जागांचं नुकसान झालं आहे.

राजस्थान -

यानंतर राजस्थान या राज्यातही भाजपला फटका बसल्याचं दिसून आलं आहे. राजस्थानात एकूण २५ लोकसभेच्या जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत इथं भाजपला पैकीच्या पैकी म्हणजे २५ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत 25 पैकी 24 जागा आणि १ जागा अपक्षाला मिळाली होती. पण यंदाच्या २०२४ च्या निवडणुकीत भाजपची घसरण होत १० जागांवर नुकसान झालं आणि १४ जागा मिळाल्या. तर काँघ्रेसला ८ जागांवर यश मिळालं आणि ३ जागांवर अपक्षांना संधी मिळाली.

हरयाणा -

तसंच हरयाणात देखील भाजपला यंदा मोठ्या पराभवाला समोरं जावं लागलं. इथं कोलसभेच्या एकूण १० जागा असून या मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपला मोदी लाटेत ७ जागा मिळाल्या होत्या. तर २०२९ मध्ये तर भाजपनं १० पैकी १० जागा घेतल्या आहेत. पण यंदा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आणि जागा थेट निम्म्यावर आल्या. त्यानुसार भाजपला ५ आणि काँग्रेसचा ५ जागा यंदाच्या निवडणुकीत मिळाल्या.

पश्चिम बंगाल -

पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 जागा आहेत. या ठिकाणी भाजप कमजोर आहे. त्यामुळं मोदी लाटेत २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपला विशेष कामगिरी करता आली नव्हती तशीच यंदाही भाजपची परिस्थिती राहिली. या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला १२, तृणमूल काँग्रेसला २९ तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला १८ जागा मिळाल्या होत्या.

कर्नाटक -

कर्नाटकातही भाजपला यंदाच्या लोकसभेत फटका बसला आहे. या ठिकाणी लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत, यांपैकी २०१४ मध्ये भाजपला १७ जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला ९ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर २०१९ ला भाजपला २५ जागा तर काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली होती. तर आता २०२४ मध्ये भाजपला 17 आणि काँग्रेसला ९ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच गेल्या निवडणुकीपेक्षा ८ जागा भाजपला कमी मिळाल्या.

या पाच जागांचा विचार केल्यास भाजपला २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभेला ४३ जागांवर पराभव झाला आहे. त्यामुळं या पाच राज्यातून भाजपला मोठी पिछाडी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT