BJP hat trick of winning all seven Lok Sabha election 2024 seats in Delhi for the third time in row Sakal
लोकसभा २०२४

राजधानीत भाजपची हॅटट्रिक

दिल्लीत विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना लोकसभेच्या निकालांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना जोरदार धक्का दिला आहे.

अजय बुवा

दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा सलग तिसऱ्यांदा जिंकण्याची हॅटट्रिक भाजपने केली आहे. पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर दिल्लीकरांना साद घालणाऱ्या भाजपच्या या कामगिरीमुळे, आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस आघाडीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तुरुंगवारीने अपेक्षित असलेली सहानुभूती मिळू शकली नाही.

दिल्लीत विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना लोकसभेच्या निकालांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना जोरदार धक्का दिला आहे. आप आणि काँग्रेस आघाडीने दिल्लीमध्ये भाजपला आव्हान दिले होते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला ५६.८६ टक्के मते मिळाली होती. तर स्वतंत्रपणे लढणाऱ्या ‘आप’ला १८ टक्के मते तर काँग्रेसला २२ टक्के मते मिळाली होती. दोन्ही पक्षांची एकत्रित मते आणि मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल तसेच आपच्या नेत्यांवर झालेली तुरुंगवासाची कारवाई यामुळे वाढलेली सहानुभूती या जोरावर दिल्लीमध्ये दोन्ही पक्षांनी विजयाची रणनीती आखत ‘आप’ने चार तर काँग्रेसने तीन जागा लढविण्याची घोषणा केली होती.

परंतु, दोन्ही पक्षांची रणनीती अपयशी ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. मागील महिनाभराच्या कालावधीत दिल्लीत वाढलेल्या पाणीसंकटामुळेही आप सरकारची कोंडी झाली.

दुसरीकडे, भाजपने मावळत्या खासदारांबद्दलची वाढलेली नाराजी लक्षात घेऊन ईशान्य दिल्लीतील मनोज तिवारी वगळता चांदणी चौक, नवी दिल्ली, वायव्य दिल्ली, दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि पश्चिम दिल्ली या सहाही मतदार संघांमधील उमेदवार बदलले.

दुसरीकडे, मनोज तिवारी यांच्याविरुद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांना उमेदवारी देऊन ईशान्य दिल्लीतील लढत लक्षवेधी बनविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. परंतु याचा फायदा काँग्रेसला झाला नाही.

मोदींच्या नावे मते

पूर्णपणे शहरी तोंडावळा असलेल्या दिल्लीमध्ये भाजपने पंतप्रधान मोदींच्या नावावर मते मागितली. या आव्हानाला दिल्लीत चांगला प्रतिसाद मिळाला. दिल्लीमध्ये आपली मतपेढी कायम राखताना जवळपास ५४ टक्के मते मिळवून सातही जागा खिशात घातल्या आहेत.

आम आदमी पक्षाला मिळालेली २५.२६ टक्के मते आणि काँग्रेसची १८.२० टक्के मते एकत्र करूनही दोन्ही पक्षांची एकत्रित टक्केवारी भाजपपेक्षा ११ टक्क्यांनी कमी आहे. अर्थात, दिल्लीमध्ये भाजपची दोन टक्के मते कमी झाली आहेत.

तर, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली असली तरी पंजाबमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. यामुळे दिल्लीत नेत्यांचे मनोमिलन पण कार्यकर्त्यांमध्ये दुरावा असे चित्र होते. त्याचा फटका काँग्रेसला बसल्याचेही दिसते. काँग्रेसची मते आपच्या उमेदवारांना गेली असली तरी आपची मते काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षित प्रमाणात मिळालेली नसल्याचे दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीवरून दिसते.

दिल्लीतील निकाल

चांदणी चौक

विजयी उमेदवार : प्रवीण खंडेलवाल (भाजप)

पराभूत उमेदवार : जयप्रकाश अग्रवाल (काँग्रेस)

फरक : ४८ हजारहून अधिक मते

पूर्व दिल्ली

विजयी उमेदवार : हर्ष मल्होत्रा (भाजप)

पराभूत उमेदवार : कुलदीपकुमार (आप)

फरक : ७८ हजाराहून अधिक मते

नवी दिल्ली

विजयी उमेदवार : बांसुरी स्वराज (भाजप)

पराभूत उमेदवार : सोमनाथ भारती (आप)

फरक : ६८ हजाराहून अधिक मते

ईशान्य दिल्ली

विजयी उमेदवार : मनोज तिवारी (भाजप)

पराभूत उमेदवार : कन्हैयाकुमार (काँग्रेस)

फरक : १.०६ लाख मते

वायव्य दिल्ली

विजयी उमेदवार : योगेंद्र चंदोलिया (भाजप)

पराभूत उमेदवार : उदित राज (काँग्रेस)

फरक : २.१४ लाख मते

दक्षिण दिल्ली

विजयी उमेदवार : रामवीरसिंह बिधुडी (भाजप)

पराभूत उमेदवार : साही राम (आप)

फरक : १.११ लाख मते

पश्चिम दिल्ली

विजयी उमेदवार : कमलजित सहरावत (भाजप)

पराभूत उमेदवार : महाबल मिश्रा (आप)

फरक : १.४९ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हॅरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT