Sangli Lok Sabha Elections esakal
लोकसभा २०२४

'संजय पाटलांचं नशीब बदलणारा माई का लाल अद्याप जन्माला यायचाय'; भाजप खासदाराचा कोणाला इशारा?

सकाळ डिजिटल टीम

''महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) विश्वासघात करून त्यांनी लिफाफ्याच्या प्रचाराचे काम केले आहे. हिम्मत असेल तर जाहीरपणे तसे सांगावे, उगाच नथीतून तीर मारू नये.''

सांगली : ‘‘लोकसभा निवडणुकीत (Sangli Lok Sabha Elections) काहींनी शब्द देऊनही पाळला नाही. काहीजण बरोबर असल्याचे भासवत होते, मात्र त्यांनी विरोधात काम केले. त्यांची सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी रडीचा डाव खेळणार नाही. लढणारा माणूस आहे. ज्यांनी निवडणुकीत रंग दाखवले, त्यांना विधानसभेला बेरंग करू,’’ असा इशारा खासदार संजय पाटील यांनी दिला. खासदार पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याविरोधात काम करणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांनाही इशारा दिला. ते म्हणाले, ‘‘संजय पाटील (Sanjay Patil) यांचे नशीब बदलणारा माई का लाल राजकीय पुढारी अद्याप जन्माला यायचा आहे. माझे नशीब जनता घडवते आणि त्यांनीच घडवले आहे.

जनता-जनार्दनाच्या आशीर्वादाने एक लाख मतांनी निवडून येईन. मला घमेंड, मस्ती नाही. मात्र काही लोक हळवे असतात, काळजी करत असतात. त्यांची काळजी मिटावी, असा उद्देश आहे. ४ जूननंतर कोणी काय केले? कुणाच्या बैठका झाल्या? कोण कोणाच्या फार्म हाऊसवर गेले होते, ते कळेल.’’

निवडणुकीच्या काळात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत खासदार पाटील म्हणाले, ‘‘या क्लिपबाबत जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील पक्षाच्या वरिष्ठांना अहवाल पाठवतील. मात्र यानिमित्ताने आतलं-बाहेरचं काम करणारे लोक उघड झाले. विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, ज्यांची ऑडिओ क्लिप आली, ते माजी जिल्हाध्यक्ष असू देत. याबाबत ४ तारखेनंतर बोलू.’’

डॉ. विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना, ‘कदम कुठल्या पाटलांच्या पाठीशी ते ४ तारखेनंतर कळेल,’ असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना संजय पाटील म्हणाले, ‘‘माझे नशीब बदलण्याची क्षमता त्यांच्यात पैदा झालेली नाही. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) विश्वासघात करून त्यांनी लिफाफ्याच्या प्रचाराचे काम केले आहे. हिम्मत असेल तर जाहीरपणे तसे सांगावे, उगाच नथीतून तीर मारू नये.’’ इस्लामपूरची मदत मिळाल्याची चर्चा असल्याबद्दल थेट उत्तर न देता,‘‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. तो वेळेला आला,’’ असे सांगत अप्रत्यक्षरीत्या त्यांनी कबुली दिली.

‘हिम्मत असेल तर गुन्हा दाखल करा’

मतदानापूर्वी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या काही व्हिडीओ क्लीप, फोटो व्हायरल झाले होते. त्याबाबत संजय पाटील म्हणाले, ‘‘व्हायरल क्लिप खोट्या असतील, फोटो मॉर्फ असतील तर त्यांनी गुन्हा दाखल करायचा होता. मात्र तो केलेला नाही. अशा आणखी काही क्लिप आणि फोटो आपल्याकडे आहेत.’’

‘उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही’

खासदार संजय पाटील म्हणाले की, जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही. त्यासाठी वीजनिर्मितीसाठी राखीव असलेल्या १२ पैकी आठ टीएमसी पाणी सांगलीला देण्यास महिनाभरापूर्वी मंजुरी दिली आहे. जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनांना पाणी कमी पडणार नाही, याची ग्वाही दिली आहे. जूनअखेर जिल्ह्याला पाणी कमी पडणार नाही, यासाठी प्रयत्न आहेत. त्यासाठी वीजनिर्मितीचे उर्वरित चार टीएमसी पाणीही प्रसंगी देण्याची अशी ग्वाही फडणवीस यांनी दिल्याचे पाटील त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT