Loksabha Election  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : भाजप ३०३ जागांचा टप्पा ओलांडेल;‘पीके’ यांचा अंदाज,लोकांत असंतोष नसल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘केंद्रातील मोदी सरकारविरोधात लोकांमध्ये तीव्र अशी असंतोषाची भावना नाही किंवा सरकारला सशक्त पर्याय हवा असेही बहुसंख्य लोकांना वाटत नाही,’’ असे स्पष्ट मत राजकीय रणनीतीकार आणि ‘जन सुराज’ पक्षाचे प्रमुख प्रशांतकिशोर (पीके) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देखील भाजपचे नेतृत्व करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भाजप या निवडणुकीमध्ये २०१९ सालच्या ३०३ जागांचा टप्पा सहज ओलांडेल असे त्यांनी म्हटले आहे.

‘पीके’ म्हणाले, ‘‘केंद्रामध्ये पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे. मागील निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या किंवा त्यापेक्षा अधिक जागा त्यांना मिळतील. काही मूलभूत गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. लोकांमध्ये सरकारप्रती रोष असेल तर ते वेगळा पर्याय शोधू लागतात. आजघडीला तरी लोकांमध्ये मोदींबाबत म्हणावा तसा राग दिसून येत नाही. लोकांना देण्यात आलेली आश्वासने आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होतो.’’

निकालादिवशी चित्र स्पष्ट

भाजपला मिळणाऱ्या जागांबाबत अंदाज व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘मुळात त्यांनी आपण ३७० पेक्षा अधिक जागा जिंकणार आहोत असा दावा केला आहे. त्यांना यापेक्षा कमी परंतु, बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या तरी तेच सरकार स्थापन करतील. ’’

‘‘आता त्यांना २७२ जागा मिळणार आहेत का? हे आपल्याला पाहावे लागेल. अर्थात हे सगळे अंदाज असून निकालाच्या दिवशीच वास्तव चित्र स्पष्ट होईल,’’ असेही प्रशांत किशोर यांनी मुलाखतीमध्ये सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ, तुतारी हाती घेण्याचं बड्या नेत्यानं केलं निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

Badlapur School Crime: कोर्टानं कालच अटकपूर्व जामीन फेटाळला अन् आज शाळेच्या दोन्ही फरार विश्वस्तांना झाली अटक

Mohammad Shami: हात जोडून विनंती करतो...! मोहम्मद शमी संतापला, 'त्या' वृत्ताचा केला इन्कार

Pune Crime: पुण्यात भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT