नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता देशभरात शेवटच्या टप्प्यात आला आहे. आत्तापर्यंत ८० टक्के निवडणूक पार पडली आहे. या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहखात्याकडून सीएएची प्रत्यक्ष प्रमाणपत्रे वाटपाचा कार्यक्रम पार पडला होता. याच लाभार्थ्यांना आज भाजपनं मोदींच्या सभेसाठी स्टेजवर उपस्थित केलं. (CAA certificates were distributed now these beneficiary directly on stage with PM Modi)
दिल्ली उत्तर पूर्व मतदारसंघात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पार पडली. या सभेत ज्या पाकिस्तानी कुटुंबाला नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए या कायद्यांर्गत भारतीय नागरिकत्व मिळालं या कुटुंबातील सदस्यांनी हजेरी लावली. यावेळी मोदींनी स्टेजवर त्यांची विचारपूस केली. दोन महिला एक पुरुष आणि एका लहान मुलीचा यामध्ये समावेश होता. यावेळी एका महिलेच्या हातात सीएएचं प्रमाणपत्र देखील होतं, हे प्रमाणपत्र तिनं स्टेजवर कॅमेरॅसमोर दाखवलं. दरम्यान, मोदींनी या कुटुंबाशी स्टेजवरच संवाद साधला तसेच त्यांचे आभार स्विकारले. यावेळी प्रेक्षकांमधून मोदी मोदी नावाचा जयघोष सुरु होता.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सीएएची प्रमाणपत्रांचं वाटप सुरु झालं असून बुधवारी पहिल्या टप्प्यात १४ जणांना ही प्रमाणपत्रे देण्यात आली. केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी नवी दिल्लीत या प्रमाणपत्रांचं वाटप केलं. दोन महिन्यांपूर्वी गृहमंत्रालयानं सीएए कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचं नोटिफिकेशन काढलं होतं.
सन २०१९ मध्ये हा कायदा संसदेत मंजूर झाला. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. या कायद्यामुळं पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या भारताशेजारील मुस्लिम राष्ट्रांमधून जे हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांक भारतात दाखल झाले आहेत. त्यांना या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व प्रदान केलं जाणार आहे.
यामध्ये हे लोक ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात वास्तव्यास असणं आवश्यक आहे. या कायद्यात ही देखील तरतूद आहे की, जर यातील कोणत्या नियमाचं उल्लंघन झालं तर ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाच्या कार्डधारकांची नोंदणी रद्द केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.