Loksabha Election Voting sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election Voting : पाचवा टप्पा भाजपसाठी धक्कादायक ठरणार! ;उत्तर प्रदेशमध्ये २०१९ च्या तुलनेत कमी जागा मिळण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता. २०) झाले. उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी हा टप्पा आश्‍चर्यकारक निकालाचा ठरू शकतो.

शरत प्रधान

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता. २०) झाले. उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी हा टप्पा आश्‍चर्यकारक निकालाचा ठरू शकतो. राज्यात २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात १४ मतदारससंघांमध्ये निवडणूक झाली होती. त्यातील १३ जागांवर विजय मिळवून भाजपला एकहाती यश मिळाले होते. पण यावेळी आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत भाजपसाठी फारशी अनुकूल स्थिती असल्याचे दिसत नाही.

गेल्यावेळची तुलना करता यंदा कोणत्याही मतदारसंघात भाजपसाठी सोपी लढत नव्हती आणि पक्षाच्या नेत्यांसाठी ही बाब चिंतेची आहे. राज्यातील निवडणूक आखाड्यात उतरलेल्या इंडिया’ आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने (सप) भाजपला पाचव्या टप्प्यातील १४ पैकी १० जागावर आव्हान दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. देशातील सर्वाधिक खासदार ‘यूपी’तून निवडून येतात.

तीन लक्षवेधी लढती

पाचव्या टप्प्यातील तीन लढती लक्षवेधी होत्या. रायबरेलीचा क्रमांक यात पहिला आहे. येथे काँग्रेसचे खासदार आणि स्टार प्रचारक राहुल गांधी हे भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांच्या विरोधात रिंगणात आहेत. गांधी घराण्याशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. दुसरी सर्वाधिक चर्चेची लढत अमेठीतील आहे.

भाजपच्या प्रभावशाली नेत्या व केंद्रीय. मंत्री स्मृती इराणी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा नशीब अजमावीत आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात त्यांना भाजपने २०१४ मध्ये उभे केले होते. त्यामुळे संपूर्ण देशभरात त्यांचे नाव झाले होते. पण पहिल्यावेळी त्यांना राहुल गांधींकडून हार पत्करावी लागली होती. २०१९ च्या निवडणुकीत मात्र स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला आणि अमेठीतून गांधी घराण्याचा खासदार होण्याची परंपरा खंडित झाली. या विजयाने पक्षातही त्यांचे वजन वाढले.

यावेळी राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी आईचा पारंपरिक मतदाररसंघ रायबरेलीतून लढण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे स्मृती इराणी यांचा सामना काँग्रेसचे सामान्य नेते किशोरीलाल शर्मा यांच्याशी होती. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळापासून शर्मा यांना या मतदारसंघाचा परिचय आहे. त्यांनी इराणी यांना चांगली लढत दिल्याचे वृत्त आहे. तिसरी सर्वांत महत्त्वाची लढत लखनौची होती. तेथे संरक्षण मंत्री राजनाथसिंह रिंगणात उतरले आहेत. ‘यूपी’तील राजधानीत त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे मतदारांमध्ये राजनाथसिंह यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण होते.

राहुल यांच्यामुळे चैतन्य

राहुल गांधी यांच्यात झालेले परिवर्तन हे ‘इंडिया’ आघाडीला बळ देणारे ठरत आहे. यावेळच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर पेलली असून त्यांच्यातील हा बदल सर्वांसाठी आश्‍चर्यकारक ठरला आहे. नागरिकांशी निगडित मुद्दे प्रचारात आणून राहुल गांधी यांनी लोकप्रिय आणि शक्तीशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकले असून आक्रमक आणि अर्थपूर्ण भाषणांनी ‘यूपी’तील तरुणांना आकर्षित केले आहे. केरळमधील वायनाड व्यतिरिक्त रायबरेलीतून निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या निर्णयाने राज्यात सुप्तावस्थेत असलेली काँग्रेस सक्रिय झाली आहे.

युवकांचा वाढता प्रतिसाद

‘यूपी’त काँग्रेस ८० पैकी केवळ १७ जागा लढवीत आहे. मात्र ‘इंडिया’ आघाडीतील समाजवादी पक्षासाठी त्यांनी प्रचाराचा धुराळा उडविला. राज्यातील कानाकोपऱ्यात, तळागाळात ‘सप’ची मुळे पोहचलेली आहे. राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नुकत्याच झालेल्या सभांना मिळणारा प्रतिसाद वाऱ्याचा रोख दाखवून देणारा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सत्ताकाळात विविध सरकारी नोकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पेपर फुटणे आणि त्यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या घटनांनी राज्यातील तरुणांमध्ये संतप्त भावना आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरुद्ध लाटेचे हे निदर्शक असून उर्वरित दोन टप्प्यांतील २७ जागांसाठी होणाऱ्या मतदानात याचे प्रतिबिंब उमटणार, हे निश्‍चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT