chandrashekhar bawankule sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : तुम्ही २४ खासदार निवडून आणून दाखवा ; चंद्रशेखर बावनकुळे यांचे शरद पवार व उद्धव ठाकरेंना आव्हान

‘‘उद्धव ठाकरे यांचे सरकार बदलले नसते आणि ठाकरे हेच मुख्यमंत्री राहिले असते, तर शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नसता. त्यामुळे निवडणुकीत कोणालाही सहानुभूती मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावरच ठाकरे यांचे १८ खासदार निवडून आले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘उद्धव ठाकरे यांचे सरकार बदलले नसते आणि ठाकरे हेच मुख्यमंत्री राहिले असते, तर शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नसता. त्यामुळे निवडणुकीत कोणालाही सहानुभूती मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावरच ठाकरे यांचे १८ खासदार निवडून आले होते. आता ठाकरेंनी पूर्वीसारखेच आणि शरद पवार यांनी सहा असे २४ खासदार निवडून आणून दाखवावेच,’’ असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट उद्धव ठाकरे व शरद पवार यांना शनिवारी दिले.

बावनकुळे यांनी शनिवारी ‘सकाळ’ कार्यालयास भेट दिली. यावेळी भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी, तिकीट वाटपाचा तिढा, महायुतीमधील नाराजीनाट्य, महाविकास आघाडीला सहानुभूतीचा मिळणारा फायदा अशा विविध प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिले. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीचा भाजपला फटका बसेल का? या प्रश्‍नावर बावनकुळे म्हणाले, ‘‘ठाकरे यांना सहानुभूती मिळावी, असे त्यांनी काय केले आहे. ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हा जनता कोरोनामध्ये मरत असताना, देवेंद्र फडणवीस हे ‘आयसीयू’ची गरज आहे, हे सांगत होते. पण ठाकरे कधी घराबाहेर पडलेच नाही.

त्यांना कशी सहानुभूती मिळेल. भाजपने ठाकरे यांचे नाही, तर ठाकरे यांनीच भाजपचे नुकसान केले. त्यांनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत, म्हणून त्यांनी कॉंग्रेसबरोबर आघाडी केली. ठाकरे यांना माणसे टिकविता आली नाहीत. जो मुख्यमंत्री मंत्र्यांना, आमदारांना भेटत नाही, मंत्रालयात येत नाही. मग ते विकास कसा करतील ? आता सहानुभूती नाही, तर कामे दाखवावी लागतात. पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कामातून ते दाखवून दिले आहे.’’

शिंदे गटावर दबाव नाही

भाजपकडून सर्वेक्षणाद्वारे शिंदे गटावर दबाव टाकला जात होता का? यावर बावनकुळे म्हणाले, ‘‘प्रत्येक पक्ष सर्वेक्षण करतो, त्यानुसार आम्हीही सर्वेक्षण केले. त्याद्वारे शिंदे यांच्यावर कुठलाही दबाव टाकण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे. आमच्यात समन्वय आहे. शेवटी विजय महत्त्वाचा आहे. राजकारणात समीकरणे बदलत असतात. आम्ही दोन्ही घटक पक्षांना विश्‍वासात घेतले आहे.’’

माढ्यातील उमेदवार बदलणार नाही

माढा मतदारसंघाबाबत बावनकुळे म्हणाले, ‘‘माढ्यामध्ये पक्षाने दिलेला उमेदवार १०० टक्के बदलला जाणार नाही. मोहिते पाटील आमच्या घरातील आहेत, त्यांचे पक्षात मोठे महत्त्व आहे. त्यांची नाराजी दूर करू.’’ काँग्रेस ही नेतृत्वहीन संघटना असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘काँग्रेस एकसंध नाही, त्यांच्यात विसंवाद आहेत. त्यांचे आपापसांत पटत नाही. केवळ दिखावापणा करत असून त्यांच्यात अंतर्गत धुसफुस आहे. केंद्रीय नेतृत्व सहजासहजी उपलब्ध होत नाही. राहुल गांधींना भेटू शकत नाहीत, त्यामुळे प्रश्‍न सुटत नाहीत.’’

खडसेंचा निर्णय केंद्रीय समिती घेईल

‘‘एकनाथ खडसे यांचे भाजपमध्ये येण्याबाबतचे मत झालेले आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय पक्षाची केंद्रीय समिती घेईल. पक्षात अशोक चव्हाण आले, उल्हास पाटील आले, शिवराज चाकूरकर यांच्या स्नुषा पक्षात आल्या. पक्ष संघटना वाढण्यासाठी, विकसित भारताला पाठिंबा देण्यासाठी खडसे येत असतील, तर त्याचा निर्णय केंद्रीय समिती करेल,’’ असे बावनकुळे यांनी सांगितले.

संवादापासून उद्धव ठाकरे दूरच

जळगावच्या उन्मेश पाटील यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबतच्या प्रश्‍नावर बावनकुळे म्हणाले, ‘‘उन्मेश पाटील, यांनी थांबायला पाहिजे होते. मला, विनोद तावडे यांना पक्षाने तिकीट दिले नव्हते. म्हणून आम्ही नाराज झालो नाही. मी स्वतः पाटील यांच्याशी चर्चा केली. इतका टोकाचा निर्णय घ्यायचा नव्हता. आता ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले असले, तरी वर्षभरात माघारी येतील. ठाकरे यांचा कार्यकर्त्यांशीही संवाद नसतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT