Sanjay Kute esakal
लोकसभा २०२४

Sanjay Kute : लोकसभा निकालात आ. संजय कुटे ठरले पुन्हा किंगमेकर

कुटे यांनी प्रतापरावांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला हे आता दिसून आले.

पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात प्रतापराव जाधव यांच्या विजयात जळगाव जामोद व खामगाव या दोन मतदार संघांनी भरभक्कम साथ दिली. त्यांच्या विजयात आ. संजय कुटे हे पुन्हा एकदा किंगमेकर सारखे धावून आले. कुटे यांनी प्रतापरावांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला हे आता दिसून आले.

जळगाव जामोद मतदार संघाचे आ. संजय कुटे हे राज्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये अग्रस्थानी असतात. पक्षपातळीवरूनही त्यांना संघटनात्मक कामांच्या जबाबदाऱ्या वेळोवेळी दिल्या जातात. यावेळी बुलडाणा मतदार संघात जाधव यांना विजय मिळवणे सहजशक्य नव्हते. त्यांच्याविरुद्ध विरोधकांनी रान माजवले होते. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी एकाएका मताची गरज होती. प्रचारादरम्यान दरदिवसाला निवडणुकीचे चित्र बदलत होते. जाधव ज्या घाटावरून येतात त्याच भागातील मतदार संघांमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. अशास्थितीत घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद मतदार संघ त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहले.

आ. कुटे यांनी जळगाव जामोद मतदार संघातून मोठा लिड देऊ हे सुरवातीपासून कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केले. पक्षसंघटन कामाला लावले. पक्ष संघटनेतील प्रत्येकाला जबाबदारी दिल्या गेली. बुथस्तरापर्यंत कामाचे विभाजन करून मतदार हा मतदानासाठी बाहेर कसा निघेल याची काळजी घेतली. त्यामुळेच मतपेटीतून जळगाव जामोद मतदार संघाने ७५ हजारांवर मते दिली. एवढीच मते खामगावमधूनही भेटली. या दोन मतदार संघांनी सुमारे दीड लाखांवर मते मिळवून दिली. जाधव यांना मिळालेल्या सुमारे साडेतीन लाख मतांमध्ये दीड लाख याच दोन मतदार संघातील आहेत. उर्वरीत दोन लाख मते घाटावरील आहेत. ही मते त्यांच्या पारड्यात टाकण्यासाठी आ. कुटे यांच्या नेतृत्वात अहोरात्र काम झाले.

त्याचे फळ निकालातून मिळाले. आ. कुटे यांचे भाजपमध्ये सातत्याने वजन वाढत आहे. बुलडाण्याची मित्र पक्षाची जागा जिंकून आणत त्यांनी आणखी एक यश मिळवले. पक्ष नेतृत्वाला त्यांच्या कामाची दखल घ्यावीच लागेल.

प्रतापराव, आता तरी घाटाखाली लक्ष द्या

या भागातील मतदार सातत्याने प्रतापराव जाधव यांना पाठबळ देत आलेला आहे. त्या तुलनेत विकास कामांसाठी जाधव इकडे लक्ष देत नाहीत, अशी कायम ओरड असते. त्यांचे स्थानिक कार्यकर्तेही तितक्या ताकदीने कामे आणत नाहीत. यामुळे जिल्हयातील हा भाग कायम मागास म्हणून ओळखला जातो. केंद्राच्या विविध योजनांमधून मोठे प्रकल्प खासदार या नात्याने त्यांनी या भागात आणणे गरजेचे आहे. किमान आता चौथ्यांदा खासदार बनल्याने ते यावेळी तरी लक्ष देतील काय असा प्रश्‍न मतदार उपस्थित करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT