बंगळुरु : कर्नाटक सरकारनं मुस्लिम समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यानं राजकारण चांगलंच तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील यावरुन काँग्रेसला टार्गेट केलं आहे. काँग्रेस पक्ष ओबीसीविरोधी असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. (Congress biggest enemy of OBCs PM after Karnataka includes Muslims in quota)
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेसनं पुन्हा एकदा मागच्या दारानं धर्मावर आधारिक आरक्षण कर्नाटकात लागू केलं आहे. इथं सर्व मुस्लिमांचा काँग्रेसनं ओबीसीत समावेश केला आहे. यामुळं ओबीसींचा मोठा वाटता हिसकावून घेण्यात आला आहे. काँग्रेस हा खतरनाक खेळ खेळत असून यामुळं आपल्या पुढच्या पिढ्या बरबाद होणार आहेत. (Marathi Tajya Batmya)
आपल्या संविधानानं धर्मावर आधारित आरक्षण पूर्णपणे प्रतिबंधित आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वतः याच्याविरोधात होते. पण काँग्रेसनं काही वर्षांपूर्वी असाच धोकादायक प्रस्ताव पारित केला होता आणि आता तो पूर्ण केला आहे. काँग्रेसकडून सातत्यानं जनतेला मूर्ख बनवलं जात असून आपला खेळ ते खेळत आहेत. काँग्रेसला ओबीसींचा मोठा शत्रू असं संबोधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संविधानानं ओबीसी, एससी, एसटीसाठी जो कोटा ठरवून दिला आहे. तो पूर्ण करण्यासाठी भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळणं गरजेचं आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुस्लिमांचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. एनसीबीसीने बुधावारी कर्नाटक सरकारच्या आकड्यांचा हवाला देत याला पुष्टी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.