Thiruvananthapuram Lok Sabha Election Results  esakal
लोकसभा २०२४

Thiruvananthapuram Lok Sabha Election Results : मंत्री चंद्रशेखरांचा पराभव करत शशी थरूर सलग चौथ्यांदा तिरुअनंतपुरममधून विजयी

काँग्रेसनं तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून डॉ. शशी थरूर यांना उमेदवारी दिली. थरूर या मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

तिरुअनंतपुरम मतदारसंघातून (Thiruvananthapuram Lok Sabha Elections) काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर (Congress candidate Shashi Tharoor) यांनी सलग चौथा विजय मिळवला.

केरळमधील हॉट सीट तिरुवनंतपुरमचे निकाल समोर आलेत. तिरुअनंतपुरम मतदारसंघातून (Thiruvananthapuram Lok Sabha Elections) काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर (Congress candidate Shashi Tharoor) यांनी सलग चौथा विजय मिळवला. या जागेवरून त्यांनी मोदी सरकारमधील मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांचा कडव्या लढतीत पराभव केला.

विजयानंतर शशी थरूर म्हणाले, "केरळमध्ये जातीय मोहीम चालणार नाही, असा जोरदार संदेश भाजपला मिळाला आहे. तिरुवनंतपुरम लोकसभा सीट केरळमध्ये आहे. गेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांपासून ही जागा शशी थरूर यांच्याकडं आहे. पहिल्या तीन निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी ही जागा जिंकली होती. 33 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं प्रथमच ही जागा जिंकली होती.

कोणत्या पक्षानं कोणाला उमेदवारी दिली?

काँग्रेसनं तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून डॉ. शशी थरूर यांना उमेदवारी दिली. थरूर या मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. तर, भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पन्नयन रवींद्रन यांना उमेदवारी दिली. भाजपनं राजीव चंद्रशेखर यांना उमेदवारी दिली होती.

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा विजय

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शशी थरूर यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. शशी थरूर यांनी भाजपच्या कुम्मनम राजशेखरन यांचा पराभव केला होता. थरूर यांनी ही जागा 99 हजार 989 मतांनी जिंकली होती. काँग्रेस उमेदवाराला 4 लाख 16 हजार 131 मते मिळाली, तर भाजप उमेदवाराला 3 लाख 16 हजार 142 मते मिळाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सी. दिवाकरन यांना 2 लाख 58 हजार 556 मते मिळाली.

लोकसभेच्या जागेचा इतिहास

1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तिरुवनंतपुरम लोकसभा जागेवर पहिल्यांदाच मतदान झालं. त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार ॲनी मास्कारेन विजयी झाल्या होत्या. 1957 च्या निवडणुकीत अपक्ष ईश्वर अय्यर यांनीही विजय मिळवला. 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार पीएस नटराज पिल्लई देखील खासदार म्हणून निवडून आले. सलग तीन निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

  1. 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत युनायटेड सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार पी. विश्वंभरन विजयी झाले. तर, 1971 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष व्हीके कृष्ण मेनन खासदार म्हणून निवडून आले. 1977 च्या निवडणुकीत सीपीआयचे एमएन गोविंदन नायर विजयी झाले होते.

  2. 1980 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने प्रथमच ही जागा जिंकली होती. काँग्रेसचे निलोहितदासन नाडर हे खासदार म्हणून निवडून आले. 1984 मध्ये काँग्रेसचे ए. चार्ल्स खासदार म्हणून निवडून आले. चार्ल्स यांनी 1989 आणि 1991 च्या सार्वत्रिक निवडणुकाही जिंकल्या.

  3. सीपीआयचे के. व्ही. सुरेंद्रनाथ विजयी झाले होते. पण, 1998 च्या निवडणुकीत काँग्रेसचे के. करुणाकरन आणि व्ही. एस. शिवकुमार 1999 मध्ये खासदार म्हणून निवडून आले. 2004 च्या निवडणुकीत सीपीआयचे पीके वासुदेवन नायर विजयी झाले होते.

  4. तर, 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे शशी थरूर खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 च्या सार्वत्रिक निवडणुका आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शशी थरूर पुन्हा विजयी झाले.

विधानसभेच्या 7 जागांचं गणित

तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघांतर्गत विधानसभेच्या 7 जागा आहेत. यात काझाकुट्टम, वट्टीयुरकावू, तिरुअनंतपुरम, नेमोम, परसाला, कोवलम आणि नेयट्टींकारा या जागांचा समावेश आहे. यापैकी 5 जागा जिंकल्या असून एक जागा काँग्रेसनं तर एक जागा जेकेसीनं जिंकली आहे. सीपीएमचे उमेदवार कडाकमपल्ली सुरेंद्रन हे काझाकुट्टममधून तर सीपीएमचे व्ही. के. प्रशांत हे वट्टीयुरकावू येथून विजयी झाले होते. सीपीएमचे व्ही. शिवनकुट्टी नेमोममधून आमदार निवडून आले. सीके हरेंद्रन परसालामधून आमदार म्हणून निवडून आले. तर जेकेसीचे अँटोनी राजू तिरुअनंतपुरम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. या शिवाय, कोवलममधून काँग्रेसचे एम. व्हिन्सेंट आणि नेयट्टींकारामधून सीपीएमचे के. अन्सलान आमदार म्हणून निवडून आले.

तिरुअनंतपुरममध्ये जातीय समीकरण काय?

2011 च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या 9.5 टक्के आहे. तर या जागेवर मुस्लिम मतदारांची संख्या 9.1 टक्के आहे. या जागेवर ख्रिस्ती मतदारांची संख्या 14 टक्के आहे. तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघात हिंदू मतदारांची संख्या 76.8 टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT