Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी सुरू ; देशभरातील ८९ मतदारसंघांत अर्ज दाखल करण्याची मुदत संपली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : येत्या २६ एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात देशातील १३ राज्यांमधील ८९ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

या टप्प्यात केरळमधील सर्वच २० मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. याशिवाय कर्नाटकमधील २८ पैकी १४, राजस्थानमधील २५ पैकी १८ मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक लढवीत असलेला वायनाड या मतदारसंघाचाही या टप्प्यात समावेश आहे. त्यांच्याविरोधात भाकपच्या अॅनी राजा तर भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन रिंगणात आहेत.

याशिवाय तिरुअनंतरपुरम येथून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांच्या लढत होणार आहे. अटिंगलमधून केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन लढत देत आहे तर अलापुझा मतदारसंघातून काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल नशीब अजमावित आहेत. राजस्थानमधील बिकानेरमधून अर्जुन राम मेघवाल मैदानात आहेत.

नांदेडकडे लक्ष

महाराष्ट्रातील नांदेडमध्ये काँग्रेस पहिल्यांदाच चव्हाण कुटुंबाशिवाय निवडणूक लढवित आहे. यामुळे नांदेडच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या टप्प्यातील बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली, परभणी या मतदारसंघांमध्ये ठाकरे व शिंदे गटांत थेट लढत होत आहे. याशिवाय वांशिक हिंसाचारामुळे प्रसिद्धीस आलेल्या ‘मणिपूर आऊटर’ या मतदारसंघातही याच टप्प्यात मतदान होणार आहे.

२६ एप्रिलला मतदान

  • विदर्भ

  • बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम

  • मराठवाडा

  • हिंगोली, नांदेड, परभणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT