Raj Thackeray Sakal
लोकसभा २०२४

Raj Thackeray: ओवैसीसारख्यांचे अड्डे उध्वस्त करा; राज ठाकरेंचं महायुतीच्या जाहीर सभेत मोदींना साकडं

शिवाजी पार्कवर आयोजित महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचे कौतुक करताना मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दहा वर्षाच्या काळात मूठभर देशद्रोह्यांनी डोके वर काढले नव्हते. मात्र काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी ओवेसीसारखे लोक पाठिंबा देत आहेत. अशा लोकांचे अड्डे सैनिक, तपास यंत्रणा लावून उद्धवस्त करा आणि देश कायमचा सुरक्षित करा, असे साकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले.

शिवाजी पार्कवर आयोजित महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचे कौतुक करताना मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. मोदींचे आभार मानत राज यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकले', असे म्हटले. (demolish bases like owaisi raj thackeray bows to pm modi in mumbai rally in mahayuti)

राज ठाकरे म्हणाले, भारतात अनेक देशभक्त मुसलमान आहेत. काही देशावर प्रेम करतात आणि त्यांची निष्ठा आहे. मात्र मूठभर लोक जे उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार आहेत. त्यांना गेल्या दहा वर्षात डोक वर काढता आले नाही. डोकं वर काढण्यासाठी काँग्रेससारखा सुलभ मार्ग नव्हता. परंतु, पिढ्यानपिढा देशात राहणारे मात्र ओवेसींच्या मागून फिरणाऱ्या लोकांचे अड्डे तपासून त्याठिकाणी माणसं किंवा देशाचे सैन्य घुसवून त्या जागा आणि देश कायमस्वरूपी सुरक्षित करा, अशी मागणी राज यांनी केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला तुम्ही धक्का लावणार अशी आवई उठवली जात आहे. ते तुम्ही कधीही करणार नाही, मात्र विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी एक घोषणा करावी, अशी मागणी केली. पंडित नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, असा विश्‍वास व्यक्त केला. काश्मीरमधून ३७० कलम हटवून हा भाग भारतात असल्याचा धाडसी निर्णय घेतला. तोंडी तलाकसारखा कायदा रद्द करून देशातील सर्व मुस्लिम महिलांमध्ये समाधानाचे वातावरण तयार केले. अनेक वर्षे अनेक योजना राबवल्या, त्यामुळे पुढच्या पाच वर्षांसाठी मोदी उभे आहेत. या काळात महाराष्ट्राकडून अनेक अपेक्षा आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी मोदींकडे अपेक्षा मांडल्या.

राज ठाकरे यांच्या अपेक्षा

  1. १८-१९ वर्षे मुंबई-गोवा महामार्ग तसाच खड्डेमय आहे, तो लवकरात लवकर व्हावा.

  2. मुंबई रेल्वेकडे लक्ष द्यावे, जास्तीत जास्त पैसे द्यावेत.

  3. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा.

  4. १२५ वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होत, त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात यावा

  5. गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT