Yusuf Pathan sakal
लोकसभा २०२४

Yusuf Pathan : निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रध्वजाचा वापर नको ; माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश

सकाळ वृत्तसेवा

बेरहामपूर : तृणमूल काँग्रेसचे बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे टी-२० क्रिकेट विश्‍वकरंडकाच्या विजयाचे चित्र प्रचार फलकांवर लावण्यासही युसूफ पठाण यांना मनाई करण्यात आली आहे. ‘मुर्शिदाबाद’च्या जिल्हाधिकारी राजश्री मित्रा यांनी हे आदेश दिले आहेत.

‘तृणमूल’ने इंडिया आघाडीशी फारकत घेत पश्‍चिम बंगालमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चौधरी यांच्या बेरहामपूर मतदार संघातून माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने येथील लढत लक्षवेधी झाली आहे.

दरम्यान, युसूफ पठादरम्यान, युसूफ पठाण यांच्या प्रचाराच्या फलकांवर टी-२० विश्‍वचषक विजयाचे आणि राष्ट्रध्वजाचे छायाचित्र वापरण्यात येत होते. यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्तांनी पठाण यांना राष्ट्रध्वज आणि टी-२० विश्‍वकरंडक विजयाचे छायाचित्र वापरण्यास मनाई केली आहे.

विश्वकरंडकाशी संपूर्ण देशाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रध्वजाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे , असे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने पठाण यांना प्रचारादरम्यान या दोन्हींच्या वापरावर बंदी घातली आहे.ण यांच्या प्रचाराच्या फलकांवर टी-२० विश्‍वचषक विजयाचे आणि राष्ट्रध्वजाचे छायाचित्र वापरण्यात येत होते.

यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्तांनी पठाण यांना राष्ट्रध्वज आणि टी-२० विश्‍वकरंडक विजयाचे छायाचित्र वापरण्यास मनाई केली आहे. विश्वकरंडकाशी संपूर्ण देशाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रध्वजाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे , असे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने पठाण यांना प्रचारादरम्यान या दोन्हींच्या वापरावर बंदी घातली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Passed Away: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास; भारतीय उद्योगाचा महामेरु हरपला

Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

Ratan Tata: सुस्वागतम... मोदींच्या एका मेसेजनंतर रतन टाटांनी नॅनोचा कारखाना गुजरातला कसा नेला?

Ratan Tata life history : ब्रीच कँडी रुग्णालयातून जेआरडी परतले अन् रतन टाटांना बोलावून घेतलं; 'त्या' सोमवारी घडली ऐतिहासिक घटना

Ratan Tata: तो दिवस नेहमीच लक्षात राहिल... जेव्हा मास्टर-ब्लास्टर सचिनने घेतलेली रतन टाटा यांची भेट

SCROLL FOR NEXT