Mallikarjun Kharge Interview sakal
लोकसभा २०२४

Mallikarjun Kharge: "संविधान धोक्यात असल्याचं सारखं म्हणू नका"; निवडणूक आयोगाची खर्गेंना नोटीस

प्रचारात संरक्षण दलांचा उल्लेख न करण्याबाबतच्या 2019 च्या सल्ल्याचं पालन करण्यासही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे 'धोक्यात आलेलं संविधान'. याच प्रमुख मुद्द्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देताना भाजपचा चांगलीच त्रेधातिरपट झाली. त्यामुळं याविरोधात भाजपनं निवडणूक आयोगात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस पाठवली असून 'सारखं संविधान धोक्यात आल्याचं म्हणू नका' असं त्यांना बजावलं आहे. (Dont pretend the Constitution is in danger Election Commission Notice to Mallikarjun Kharge)

निवडणूक आयोगानं खर्गेंना दिलेल्या नोटिशीत म्हटलं की, काँग्रेस स्टार प्रचारकांनी 'भारताचे संविधान रद्द होईल किंवा संपवलं जाऊ शकते' अशी खोटी प्रभाव टाकणारी विधानं करू नयेत तसेच प्रचार करताना संरक्षण दलांचा उल्लेख न करण्याबाबतच्या 2019 च्या सल्ल्याचं पालन करण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं 'संरक्षण दलांच्या सामाजिक-आर्थिक रचनेबाबत संभाव्य फूट पाडणारी विधाने करू नयेत' असंही निवडणूक आयोगानं आपल्या नोटिशीत म्हटलं आहे.

भाजपनं निवडणूक आयोगाकडं तक्रार करताना म्हटलं की, "मोदी सरकार सत्तेत परतलं तर ते संविधानालाच नष्ट करुन टाकेल," असा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. तसेच "अग्निवीर योजनेचा संदर्भ देत सरकारनं दोन प्रकारचे सैनिक निर्माण केले आहेत," असा आरोप राहुल गांधींनी केला होता. याविरोधात भाजपनं राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

दरम्यान, निवडणूक आयोगानं आज भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. यामध्ये भाजपविरोधात काँग्रेसनं तक्रार केली होती की, पंतप्रधान मोदींसह भाजपतील प्रत्येकजण मुस्लिम विरोधी विधानं करत आहे. त्याचबरोबर इतरांची संपत्ती मुस्लिमांना वाटण्यात येईल आणि ते अतिरिकेती आहेत असा खोटा प्रचार केला जात असल्याचं म्हटलं आहे. यानंतर निवडणूक आयोगानं जेपी नड्डा आणि मल्लिकार्जुन खर्गे अशा दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना नोटीस पाठवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT