Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदान जनजागृती

उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा ज्वरही वाढत जात आहे. मात्र राज्यात आतापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी कमी असल्याने पुण्यातील मतदानाचा टक्का वाढणे आवश्‍यक आहे. मतदारांनी आपला हक्क बजावून लोकशाही मजबूत करावी, यासाठी पुणे महापालिकेनेही कंबर कसली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा ज्वरही वाढत जात आहे. मात्र राज्यात आतापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी कमी असल्याने पुण्यातील मतदानाचा टक्का वाढणे आवश्‍यक आहे. मतदारांनी आपला हक्क बजावून लोकशाही मजबूत करावी, यासाठी पुणे महापालिकेनेही कंबर कसली आहे. २८०० बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सुमारे साडेसात हजार महिला जनजागृती करत आहेत. चित्रकला स्पर्धा, पथनाट्य असे उपक्रमही राबविले जात आहेत.

का आली जाग?

शहरातील कात्रज, शिवाजीनगर भागातील सोसायट्यांच्या समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने या समस्यांचे निवारण केले. त्याच वेळी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी बैठक घेऊन विविध विभागांना जबाबदारी दिली आहे. यामध्ये समाजविकास विभागाची जबाबदारी महत्त्वाची आहे.

‘आयएलएस’ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदानाच्या जनजागृतीसाठी पथनाट्य तयार केले आहे. त्याचे पुणे शहरात विविध ठिकाणी सादरीकरण केले जात आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी समाजविकास विभागातर्फे जनजागृती केली आहे. ‘ताई मतदानाला चला’ अभियानाला प्रतिसाद मिळत आहे. चित्रकला, रांगोळी स्पर्धा यांचे नियोजन केले जात आहे. पुणे जिल्ह्यात दोन्ही टप्प्यांत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- नितीन उदास,

उपायुक्त, समाजविकास विभाग

क्षेत्रीय कार्यालयांच्या बैठकीत सूचना

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. ३०) कोथरूड बावधन, धनकवडी-सहकारनगर, कोंढवा-येवलेवाडी या चार क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. यामध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अशी आहे स्थिती

  • लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात दोन टप्प्यांतील मतदान झाले आहे

  • तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात, तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान

  • दोन्ही टप्प्यांत पुणे शहराच्या भागाचा समावेश.

  • राज्यात दोन टप्प्यांत कमी मतदान झाले आहे, त्यामुळे हक्काचा मतदार बाहेर काढून त्यांना मतदान करायला लावणे राजकीय पक्षासाठी आव्हानात्मक

असे आहेत उपक्रम

  • समाजविकास विभागाकडे दोन हजार ८०० बचत गट असून, त्यातील ७ हजार ५०० महिलांना मतदान जनजागृती उपक्रमात सहभागी करून घेतले आहे

  • बचत गटातील महिलांकडून त्यांच्या भागातील मतदारांमध्ये मतदानासाठी जागृती

  • ‘ताई मतदानाला चला,’ ‘ताई, वहिनी, मावशी, आजी मतदानाला चला’, असे फलक लावून आवाहन केले जात आहे. त्याचा फायदा वस्ती पातळीवर होत आहे

  • लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT