election commission of india sakal
लोकसभा २०२४

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

या प्रकरणात जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कर्नाटक भाजपनं काँग्रेसविरोधात केलेली आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं ट्विटरला दिले आहेत. याप्रकरणी आयोगानं अधिकृत पत्रही पाठवलं आहे. तसेच या प्रकरणात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. (ECI directs X to take down BJP Karnataka objectionable post with immediate effect)

कर्नाटक भाजपनं ४ मे रोजी एक अॅनिमेटेड व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निशाणा बनवण्यात आलं होतं. या १७ सेकंदाच्या क्लीपमध्ये कन्नड भाषेत सावध राहा, सावध राहा, सावध राहा असा इशारा देण्यात आला होता. (Latest Marathi News)

या व्हिडिओवर काँग्रेसनं आक्षेप घेत ५ मे रोजी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली होती. यामध्ये काँग्रेसनं आरोप केला होता की, भाजपनं याद्वारे दंगलीला आणि शत्रुत्वाला चिथावणी दिली आहे. काँग्रेसच्या या तक्रारीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला निर्देश दिले की त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ती पोस्ट हटवावी. पण आदेश देऊनही भाजपनं तो व्हिडिओ हटवलेला नाही. (Marathi Tajya Batmya)

या घटनेनंतर बंगळुरु पोलिसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम १२५ आणि ५०५ (२) अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT