Jaiprakash Narayan 
लोकसभा २०२४

Election Story: 'संपूर्ण क्रांती'चा नारा अन् बिगर काँग्रेसी सरकार सत्तेत! वाचा निवडणुकीतील घोषणांचे रंजक किस्से

Loksabha Election 2024 : देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे १९४७ पासून १९७७ पर्यंत जवळपास ३० वर्षे काँग्रेसची एकछत्री व निर्विवाद अशी सत्ता होती.

सकाळ वृत्तसेवा

Loksabha Election 2024 Marathi News : देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे सन १९४७ पासून १९७७ पर्यंत जवळपास ३० वर्षे देशावर काँग्रेसची एकछत्री व निर्विवाद अशी सत्ता होती. जनता पक्षाचे नेते जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसच्या सत्तेवरून घालविण्यासाठी 'संपूर्ण क्रांती'चा नारा दिला.

हा नारा थेट निवडणूक प्रचारातला नसला तरी या घोषणेनं स्वतंत्र भारतातील पहिलं राजकीय सत्तांतर घडवून आणल्यानं या घोषणेलाही तेवढंच मोठं महत्त्व आहे. (Election Story slogan of total revolution then first non congress government comes in power)

काँग्रेसचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून कन्या इंदिरा गांधी यांना नेमल्यापासूनच या असंतोषाची पेरणी झाली होती. एकाधिकारशाही, भ्रष्टाचार, जातीपातीच्या राजकारणानं कळस गाठला होता. काँग्रेसच्या बेबंदशाहीला उलथवून टाकण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी १५ जून १९७५ ला पाटण्याच्या गांधी मैदानावर संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. (Marathi Tajya Batmya)

या सभेत लाखो लोकांनी जातपात, हुंडा, भेदभाव सोडण्याचा संकल्प केला. संपूर्ण क्रांतीत केवळ सत्तांतर नव्हे तर राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैश्विक, शैक्षणिक व आध्यात्मिक अशा सात क्रांती ‘जेपीं’ना अपेक्षित होत्या. संपूर्ण क्रांतीचा जोर एवढा प्रचंड होता की तरुणांचे, विद्यार्थांचे लोंढे रस्त्यावर आले. महाविद्यालये, विद्यापीठे बंद पडली. (Latest Marathi News)

बिहारमधून निर्माण झालेले हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. समाजातील सर्वांत पिचलेल्या वर्गाला सत्तेच्या शिखरावर पोहोचवून व्यवस्था परिवर्तन करायचे आहे, असा संदेश ‘जेपीं’नी दिला होता. या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ला आणीबाणी लादून केला. मात्र, जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या आघाडीनं सन १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करत अभूतपूर्व असं यश मिळवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT