Sharad Pawar sakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar : विलीनीकरणावरून टीकेच्या फैरी; शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘आगामी काळात काही प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस पक्षाला सहकार्य करतील किंवा त्यामध्ये विलीन होतील,’ असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. विरोधी पक्षांनी तर शरद पवार यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होईल अशी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्यावरून टीका केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ शरद पवार हे मोठे नेते आहेत त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ठाकरे गटाची यापूर्वीच काँग्रेस झाली आहे त्यामुळे विलीनीकरणाची केवळ औपचारिकता बाकी आहे.’’ शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष ( एस ) हा १९८६ मध्ये काँगेसमध्ये विलीन केला होता आम्ही त्याचे साक्षीदार आहोत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विरोधी नेत्यांकडून समर्थन

एका बाजूला विरोधकांनी विलिनीकरणाच्या चर्चेवरून हल्लाबोल केला असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील विलिनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘‘ शरद पवार यांनी जे काही वक्तव्य केले त्यावेळी आपण उपस्थित होतो. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. त्यानंतरच पवार यांनी सांगितलेले समीकरण अस्तित्वात येणार की नाही हे स्पष्ट होईल.’’

पवार नेमके काय म्हणाले?

पवार यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘‘ नजीकच्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसबरोबर अधिक समन्वय राखून काम करतील तर यातील काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये विलीन होतील.’’ हा निकष राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार या पक्षाला लागू होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वैचारिक फरक दिसत नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतली जातील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT