Loksabha Election Result|Exit Poll Date And Time Esakal
लोकसभा २०२४

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

Amit Ujagare (अमित उजागरे)

Marathi Exit Polls Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चा शेवटचा सातवा टप्पा उद्या १ मे रोजी पूर्ण होत आहे. उद्या हे मतदान पार पडल्यानंतर लगेचच निवडणूक सर्व्हे करणाऱ्या कंपन्यांकडून आपापले एक्झिट पोल्स जाहीर होतील.

या एक्झिट पोल्सनुसार यंदाचा निवडणुकीत इंडिया आघाडी बाजी मारेल की एनडीए? किंवा काँग्रेस जिंकेल की भाजप? याचे अंदाज समोर येतील. ज्या कंपन्या हे एक्झिट पोल्सचे सर्व्हे घेतात त्यात वैज्ञानिक पद्धतींचा आणि इतर विविध घटकांचा समावेश असतो.

पण तरीही अनेकदा हे अंदाज चुकतात. पण अशी कुठली कारणं आहेत? जी हे अंदाज चुकण्यास कारणीभूत ठरु शकतात? (Exit Polls Lok Sabha Election 2024 for many reasons predictions of exit polls may go wrong need to know this reason)

1) सदोष मुलभूत आधार : एक्झिट पोल्स हे वैयक्तिक मुलाखती घेऊन मतदार जी निवड करतात ते गृहितक मानून अंदाज काढला जातो. पण, हा सॅम्पल सदोष असू शकतो कारण काही व्यक्ती जाणूनबुजून विश्लेषकाला फसवू शकतात. तर काही जण विशेषत: उपेक्षित किंवा असुरक्षित समुदायातील मतदार आपली खरी मतं लपवण्यासाठी खोटं बोलू शकतात. याव्यतिरिक्त, एक्झिट पोल्सचे सॅम्पल हे बहुतेकवेळा मतदान केंद्राच्या बाहेरच घेतलं जातं. त्यामुळं उत्तरं देणारे लोक आपलं वास्तविक मत व्यक्त करण्याऐवजी सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य उत्तरं देतात.

2. चुरशीची स्पर्धा: एक्झिट पोल सामान्यत: 1 ते 3 टक्क्यांच्या त्रुटीच्या फरकानं येतात. सन 2018 मध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश यांसारख्या निवडणुकांमध्ये मतांच्या शेअरमधील फरक 1 टक्क्यांपेक्षा कमी होता, हे फरक एक्झिट पोल्समध्ये महत्वाचे ठरतात.

3. कॉस्ट-कटिंग आणि पद्धतींचा दबाव : बजेटची मर्यादा आणि वेळेची मर्यादा एक्झिट पोलच्या गुणवत्तेशी तडजोड करू शकतात. अनेक मीडिया चॅनेल कमी बजेटमध्ये काम करतात त्याचा परिणाम संशोधन आणि डेटा संकलनावर होतो. याशिवाय, त्वरित पोल्स जाहिर करण्याच्या दबावामुळं शॉर्टकट वापरले जाऊ शकतात. यामध्ये फोनवरुन मुलाखती घेणं, यामध्ये जमिनीवरील वास्तविकता अचूकपणे प्रतिबिंबित करता येत नाही.

4. सॅम्पलिंगमधील मानवी चुका : तंत्रज्ञानात मोठी प्रगती असूनही सॅम्पलिंगमध्ये व्यक्ती परत्वे त्रुटी निर्माण होऊ शकतात. फील्डवरील लोक सोयीस्कर मतदान केंद्र निवडू शकतात, त्यामुळं विशेषत: शहरी भागात निकाल बदलू शकतात.

5. जुन्या डेटावर अवलंबून राहणं : एक्झिट पोल अनेकदा विश्लेषणासाठी ऐतिहासिक निवडणूक डेटावर अवलंबून असतात. पण, भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात, विकसनशील लोकसंख्या आणि मतदान पद्धतींमुळं अशा प्रकारचे जुने डेटा वर्तमान भावनांचं अचूक प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. लोकसंख्या वाढ, मतदार याद्यांमधील बदल आणि मतदानातील बदल यांसारख्या घटकांमुळं अंदाज बांधणं गुंतागुंतीचं होऊ शकतं.

6. जात आणि सामाजिक-आर्थिक डेटाचा अभाव : जात आणि सामाजिक-आर्थिक लोकसंख्याशास्त्रावरील सर्वसमावेशक डेटा जर उपलब्ध नसेल तर अचूक मतदानाचा अंदाज घेण्यात अडचणी येतात. सन 1934 मध्ये शेवटची जात जनगणना करण्यात आली होती, ज्यामुळं निवडणुकीच्या निकालांवर जातीच्या गतिशीलतेच्या प्रभावाचं मूल्यांकन करणं कठीण होतं. त्याचप्रमाणं, मतदारांच्या आर्थिक प्रोफाइलवरील मर्यादित माहिती देखील पोल्सच्या अंदाज चुकवू शकते.

7. महिलांचं अपुरं प्रतिनिधित्व : महिला मतदारांचा वाढता प्रभाव असूनही, एक्झिट पोल्सची सॅम्पल घेताना त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं गेल्यानं अचूक निष्कर्ष काढण्यात अडचण येऊ शकते. भारतात महिला या एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्म्या आहेत. पण सर्वेक्षणांमध्ये त्यांचा सॅम्पल म्हणून वापर सामान्यतः 25 टक्के ते 30 टक्क्यांपर्यंतच असतो. या विषमतेमुळं निवडणूक निकालांच्या अंदाजात चुका होऊ शकतात, विशेषत: ज्या मतदारसंघात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

शेवटी, एक्झिट पोल्स हे लोकांची मतांचा अंदाज घेण्यासाठी मौल्यवान साधन म्हणून काम करत असताना, त्यांची विश्वासार्हता ही विविध मर्यादा आणि आव्हानांच्या अधीन असते. त्यामुळं भारतातील जनता सध्या ताज्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची वाट पाहत असताना, कोणता पोलस्टर (एक्झिट पोल) मतदारांची नाडी अचूक पकडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT