Uddhav Thackeray and Narendra Modi 
लोकसभा २०२४

PM Modi: "बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे"; PM मोदींचा पुन्हा ठाकरेंना साद घालण्याचा प्रयत्न?

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : नकली शिवसेना असं वारंवार संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पण आता मोदींची भाषा मवाळ झाली आहे. कारण एका मीडिया ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बाळासाहेबांच्या कार्याची प्रशंसा करतानाच त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत नेहमीच सन्मान आणि शिष्टाचार जपला गेला आहे, असं म्हटलं आहे. (Have maintained dignity with every member of Balasaheb family irrespective of political dynamics says PM Modi)

मुलाखतीत मोदी म्हणाले, "बाळासाहेब आयुष्यभर राष्ट्रहिताला प्राधान्य देत राजकारणासाठी उभे राहिले. बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला नितांत आदर आहे आणि त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. ते आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे आणि प्रभावशाली नेते आहेत. बाळासाहेबांनी आयुष्यभर राष्ट्रहिताला चालना देणारे राजकारण केलं. तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या विरोधात मी बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत आदर राखला आहे, परंतु बाळासाहेबांचा एक प्रशंसक म्हणून मला काही गोष्टींमुळं वेदना होत आहेत"

"वीर सावरकरांना शिव्या देणारे आणि औरंगजेबाचा जयजयकार करणाऱ्या आणि 'सनातन धर्मा'चा टीका करणाऱ्या पक्षांसोबत युती करणाऱ्या लोकांकडं बघून बाळासाहेब ठाकरेंना सध्याच्या काळात काय वाटलं असतं, असं आपल्याला कधी कधी वाटतं. मुंबई आणि तिथली जनता बाळासाहेबांच्या हृदयाजवळ होती. पण आता मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींचा प्रचारासाठी वापर करताना जर बाळासाहेबांनी या लोकांना पाहिलं असतं तर त्यांना काय वाटलं असतं? हे लोक जे उघडपणे त्यांच्याशी मैत्री करतात याबद्दल त्यांना काय वाटलं असेल? सनातन धर्माचा नाश करायचा आहे असं हे म्हणतात आणि हे लोक सावरकरांना शिव्या देत आहेत हे पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असेल?" असंही मोदींनी म्हटलं आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, शिवसेना (उद्धव ठाकरेंचा गट) आणि द्रमुक हे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत आहेत. द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी 'सनातन धर्मा'ची तुलना 'मलेरिया' आणि 'डेंग्यू' यांसारख्या आजारांशी केली होती. तर जातिव्यवस्था आणि भेदभावाच्या नावाखाली सनातन धर्माचं उच्चाटन करण्याचं समर्थनही त्यांनी केलं होतं. बाळासाहेबांनी नेहमीच आपल्या तत्त्वांना सत्तेच्या वर ठेवलं, पण आता असं दिसतं की या लोकांसाठी सत्ताच सर्वस्व आहे, अशा शब्दांत नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधला. ते पुढे असेही म्हणाले की, 'खरी राष्ट्रवादी' आणि 'खरी शिवसेना' हे सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीचा भाग आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, वायनाडचे खासदार ‘माओवादी विचारसरणी’सारखे बोलत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ‘धोकादायक बाबी’ आहेत. तुम्हाला त्यांचा तुष्टीकरणाचा ट्रॅक रेकॉर्ड माहित आहे आणि तुम्ही पाहत आहात की काँग्रेसचे शहजादा कसे माओवादी विचारसरणीसारखे बोलत आहेत. यातील समस्या मांडणं हे माध्यमांचं कर्तव्य नाही का?"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT