लोकसभा २०२४

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांना का दिलं असं उत्तर?

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघांसह एकूण १३ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सहकुटुंब मतदानाचा हक्का बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला, यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मी काय ज्योतिषी आहे का? असा सवाल त्यांनी केला. (I am not an astrologer MNS Raj Thackeray reply to reporters after cast his vote with family)

त्यांच्याकडून अपेक्षाच नको

राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित आणि सून उर्वशी ठाकरे असं सहकुटुंब दादरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी नवमतदारांना काय आवाहन कराल? असा प्रश्न केला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते मतदानासाठी उतरतीलच. पण काहीजणांच्या आशा संपल्या असतील तर त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षाच करु नका.

ज्योतिषी आहे का?

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत महिला मतदार 'सायलंट वोटर' म्हणून महत्वाची भूमिका बजावतील का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला की, मी काही भविष्यवेत्ता नाही, मी काय ज्योतिषी आहे का? असं त्यांनी म्हटलं.

देशभरात ४९ मतदारसंघात मतदान

देशभरात आज सातपैकी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये ८ राज्यांमधील एकूण ४९ मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यानुसार आज धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण महाराष्ट्रातील या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संघ थेट प्रचारात उतरणार? ७० दिवसांचा मेगा प्लॅन रेडी; पण फायदा कुणाला?

ATC Raid : मालेगावसह मराठवाड्यात एटीएस, एनआयएची पहाटे छापेमारी; अनेक तरुणांना उचललं

Latest Maharashtra News Updates : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा

Sakal Podcast : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य ते सात वर्षांनंतर परणार 'हॉकी इंडिया लीग'

Kolhapur Crime : कागलमध्ये विवाहितेनं संपवलं जीवन; पतीसह सासूला अटक, लहान बाळाचा रडताना आवाज आला अन्...

SCROLL FOR NEXT