Sharad Pawar  esakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : 'लोकसभा निवडणूक लढाल तरच टिकाल, नाहीतर संपून जाल'; असं का म्हणाले शरद पवार?

मराठी भाषिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समितीने निवडणूक लढवून आपले अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

'सीमालढ्याचा एक भाग म्हणून आणि मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी समितीने निवडणुका लढवण्याची भूमिका घ्यावी, यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.'

बेळगाव : मराठी भाषिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समितीने निवडणूक लढवून आपले अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढविण्याशिवाय पर्याय नसून, ‘लढाल तरच टिकाल नाही तर संपून जाल’ असा मोलाचा सल्ला माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणि मराठी भाषिकांच्या कायम सोबत आहे, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली. खानापूर तालुका समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी (ता.२४) मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

तसेच, सीमाभागातील सद्य:स्थितीची माहिती देत गेल्या काही दिवसांपासून सीमाभागात कन्नडची सक्ती केली जात आहे. त्यामुळे मराठी भाषिकांना विविध प्रकारच्या दडपशाहीचा सामना करावा लागत असून, पुन्हा एकदा कन्नडसक्तीविरोधात लढण्याची गरज निर्माण झाली आहे. समितीची ताकद वाढविण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेला पाठिंबा देऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली.

यावेळी माजी मंत्री शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. सीमाभागातील परिस्थितीची जाणीव आहे. तसेच समितीच्या नेत्यांकडून विविध प्रकारची माहिती दिली जाते. सीमालढ्याचा एक भाग म्हणून आणि मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी समितीने निवडणुका लढवण्याची भूमिका घ्यावी, यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी समितीने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यास त्याला सहकार्य करून उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी खानापूर तालुका समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, मुकुंद पाटील, गुरुराज सरदेसाई आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT