कागलमधून आम्हाला ७० ते ८० हजार मताधिक्य अपेक्षित होते. ते मिळाले नाही. देशासह राज्यातील परिस्थितीचा जसा सगळीकडे परिणाम झाला तसा तो इथेही झाला.
कोल्हापूर : ‘देशाच्या निकालाप्रमाणेच कोल्हापूरचा निकाल (Kolhapur Lok Sabha Result) आहे. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगवगेळी आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठा आरक्षणाचा फटका बसला. शेतमालाचे दर, कापूस, कांदा याचबरोबर कोल्हापुरातून जाणारा शक्तिमार्ग ही कारणे आहेत. याचबरोबर विरोधी उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) होते. त्याचाही फायदा महाविकास आघाडीला झाल्याचे मत खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले, ‘पराभव झाला असला तरी त्यांचे चिंतन करणे आवश्यक आहे ते आम्ही करू. भविष्यात पुढील वाटचालीसाठी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली जाईल. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन वाटचाल केली जाईल. राज्य-केंद्र पातळीवर परीक्षण करावे लागेल. कॉंग्रेसने ६८ वर्षे देशावर राज्य केले आहे.
मानसिकता बनवण्यात ते चॅम्पियन आहेत. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नव्हते, काहीही ध्येय धोरण नव्हते. म्हणून त्यांनी संविधान बदलणे आणि महागाई असे कार्ड मोठ्या प्रमाणात वापरले. कागलमधून ७० ते ८० हजाराचे तर चंदगड मधून ३० ते ३५ हजारांचे मताधिक्य मिळेल, असे आम्हाला वाटत होते. परंतु ते तसे झाले नाही ही वस्तुस्थिती आहे.’
‘लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना कागल व चंदगडमधून अपेक्षित मताधिक्य न मिळाल्यानेच त्यांचा पराभव झाला. याशिवाय मराठा आरक्षण, कांदा प्रश्न, जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ मार्ग याचेही निकालात पडसाद उमटल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘पराभवाची कारणमीमांसा आम्ही करूच. कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये असे होऊ नये यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील.
महायुतीला एकदिलाने हातात हात घालून विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागेल. पण लोकसभेचा परिणाम विधानसभेत होत नाही. कागलमधून आम्हाला ७० ते ८० हजार मताधिक्य अपेक्षित होते. ते मिळाले नाही. देशासह राज्यातील परिस्थितीचा जसा सगळीकडे परिणाम झाला तसा तो इथेही झाला. चंदगडमध्ये आठ ते नऊ हजार मताधिक्याने मागे राहिलो. करवीर आणि राधानगरी या दोन्ही मतदारसंघात फार मोठे मताधिक्य घटले, त्याचा आम्ही निश्चितपणे विचार करू. दक्षिणचे मी मनापासून कौतुक करेन. कागलचे घटलेले मताधिक्य हा मलासुद्धा अनपेक्षित धक्काच आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.