Loksabha Election 2024  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : गोव्यात काँग्रेस उमेदवाराच्या शोधात!

गोव्यात दक्षिण आणि उत्तर गोवा या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. मात्र काँग्रेस अजूनही उमेदवारांची निवड करू शकलेले नाही.

सकाळ वृत्तसेवा

गोव्यात दक्षिण आणि उत्तर गोवा या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. मात्र काँग्रेस अजूनही उमेदवारांची निवड करू शकलेले नाही. पक्षावरील आर्थिक संकटामुळे उमेदवार निवडायचा झाल्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवाराचीच निवड करणे आवश्‍यक ठरणार आहे.

गणाधीश प्रभुदेसाई

लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असल्या तरी गोव्यात काँग्रेसला याची माहिती आहे ना? असा प्रश्‍न विचारावा अशी परिस्थिती आहे. काँग्रेसला गोव्यातील दोन जागांसाठी अजून उमेदवार सापडलेले नाहीत. दक्षिण गोव्यातून गिरीश चोडणकर हे इच्छुक आहेत. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. पण त्यांनाच उमेदवारी मिळणार का, हे अद्याप सांगता येत नाही. उत्तर गोव्यातूनही उमेदवार कोण? हा प्रश्‍न अद्याप कायम आहे.

काँग्रेसने गिरीश चोडणकर यांना उमेदवारी दिल्‍यास अल्‍पसंख्‍याक गटाकडून अपक्ष उमेदवार उभा केला जाईल. काँग्रेसला धडा शिकविण्‍याची गरज भासल्‍यास उत्तर गोव्‍यातूनही अपक्ष उमेदवार उभा करू, असा इशारा राधाराव ग्रासियस यांनी दिला आहे. काँग्रेसचे गोव्‍याचे निरीक्षक वेणुगोपाल हे चोडणकर यांच्यासाठी आग्रही आहेत. मात्र, काँग्रेस आमदारांचा चोडणकर यांना विरोध आहे. शेवटी सोनिया गांधी यांना या उमेदवारीबद्दल हस्‍तक्षेप करावा लागला आणि वेणुगोपाल यांना चोडणकर यांना उमेदवारी देण्यापासून रोखले, असे राधाराव यांनी म्‍हटले आहे. यावरून चोडणकरांचा मार्ग अडचणीचा आहे, हे स्पष्ट होते. सध्या शांत असलेल्या काँग्रेस पक्षातील बंडाळी उमेदवार जाहीर झाल्यानंतर उफाळून येऊ शकते.

‘आप’चा प्रचार सुरू

दुसरीकडे, आम आदमी पक्षाच्या नेत्यांनीही मडगावातून प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवार कुणीही असो, आमचा प्रचार सुरू आहे, असे यावेळी ‘आप’चे आमदार वेंझी व्हिएगस यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवार ठरलेला नसतानाही प्रचार का, असे पत्रकारांनी विचारले असता, ‘‘आम्हाला उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. देश सांभाळून ठेवण्यासाठी आम्ही भाजपविरोधात ही आघाडी उभी केली आहे. भाजपने देशाची कशी वाट लावली हे लोकांना कळले पाहिजे, तेच आम्ही करत आहोत,’’ असे आमदार व्हिएगस यांनी सांगितले.

घरचा अहेर

काँग्रेस पक्ष उमेदवार जाहीर करण्‍यास विलंब लावत आहे. त्‍यामुळे कार्यकर्ते प्रचंड अस्‍वस्‍थ तर झाले आहेतच, शिवाय मतदारांच्‍या मनातही संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपला फायदेशीर व्‍हावे, यासाठीच मुद्दाम हा वेळकाढूपणा केला जात आहे, असा संशय मतदार व्यक्त करू लागले आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे सावियो कुतिन्हो यांनी घरचा अहेर दिला.

धनवान नेतृत्वाचा शोध

काँग्रेसचे दक्षिण आणि उत्तर गोव्यातील दोन उमेदवार ठरविण्यात दिल्लीश्‍वरांना अद्याप यश आलेले नाही. काँग्रेस पक्षाच्या आर्थिक खात्यांवर निर्बंध आल्याने पक्षाकडून निवडणुकीसाठी निधी येईल की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वखर्चाने निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या नेतृत्वाचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील गटातटाचे राजकारणही अद्याप काही थांबलेले नाही. त्यामुळे अनेक नेत्यांची तोंडे दाही दिशेला असल्याचे सध्याचे चित्र आहे.

राज्यातील स्थिती २०१९

*उत्तर गोवा

श्रीपाद नाईक (भाजप) - विजयी - २४४८४४

गिरीश चोडणकर (काँग्रेस) - १६४५९७

*दक्षिण गोवा

फ्रान्सिस सार्दिन (काँग्रेस) - विजयी - २०१५६१

ॲड. नरेंद्र सवाईकर (भाजप) - १९१८०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT