Kalyan Lok Sabha Constituency MNS MLA Raju Patil esakal
लोकसभा २०२४

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

2014 ला शरद पवार यांनी जेव्हा युती तुटली होती, तेव्हा बीजेपीचे 126 आमदार आले होते.

शर्मिला वाळुंज

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, राज ठाकरेंनी जेवढी मेहनत भाजपसाठी केली, तेवढी मेहनत स्वतःच्या पक्षासाठी केली असती तर...

डोंबिवली : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका करताना त्यांना कोणी सुपारी दिलीये का बघा असे आरोप केले आहेत. याला मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी उत्तर दिले असून 2014 ला भाजपाचे जेव्हा 126 आमदार आले, तेव्हा शरद पवार यांनी बिनशर्थ पाठिंबा दिला होता. ती जर सुपारी होती तर होय आमची ही सुपारी आहे असे बोल लगावले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजू पाटील यांनी ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर भेट देत आढावा घेतला. यावेळी पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर जी टीका केली, त्यावर प्रश्न विचारला असता मनसे आमदार पाटील यांनी आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जशातसे उत्तर दिले आहे.

आव्हाड म्हणाले, राज ठाकरेंनी भाजपची सुपारी घेतली!

यावर मनसे आमदार पाटील म्हणाले, 2014 ला शरद पवार यांनी जेव्हा युती तुटली होती, तेव्हा बीजेपीचे 126 आमदार आले होते. त्यावेळेस न मागता बिनशर्त पाठिंबा दिला होता. ती जर सुपारी असेल तर होय ही आम्ही सुपारी घेतली असे आमदार म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, राज ठाकरेनी जेवढी मेहनत भाजपसाठी केली, तेवढी मेहनत स्वतःच्या पक्षासाठी केली असती तर...यावर मनसे आमदार पाटील म्हणाले, ते आमचं आम्ही बघू. त्यांनी चिंता करायची गरज नाही. ४ तारखेनंतर त्यांनी स्वतःची चिंता करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT