Kalyan Loksabha  sakal
लोकसभा २०२४

Kalyan Loksabha : मंत्र्यांच्या बंगल्यावर कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक ; बंद दाराआड काय खलबत शिजली ?

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर रविवारी कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर रविवारी कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. या बैठकीत नेमके काय झालें यावर कोणी ही बोलण्यास तयार नाही. वरिष्ठांनी तशी तंबी कार्यकर्त्यांना दिली असल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी ही बैठक बोलावल्याचे बोलले जात आहे मात्र यावर ठाम बोलण्यास कोणी तयार नाही.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील ताणतणाव काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे करत असले तरी शिवसेनेने अद्याप श्रीकांत यांचे नाव जाहीर केलेले नाही. वरिष्ठ नेतेमंडळी शिंदे यांचे नाव जाहीर करत असल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून शिवसेनेला सहकार्य न करण्याची भूमिका येथे भाजपच्या काही गटांनी घेतली आहे.

त्यात दिव्यानंतर कल्याण पूर्वेतून उघड उघड सेनेला नाराजी दर्शवली जात आहे. आमदार गायकवाड समर्थक भाजप कार्यकर्त्यांची कल्याण पूर्वेत एक बैठक पार पडली. यात शिंदे यांना सहकार्य न करण्याची भूमिका भाजपने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यावरून मोठा गदारोळ शिवसेना व भाजपात झाला असून त्यावर काहीसा पडदा पाडण्यासाठी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेच असतील असे जाहीर करत सेनेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने महायुतीचे वातावरण खराब करणाऱ्यांना वरिष्ठांनी समज दिली पाहिजे असे म्हणत खासदार शिंदे यांनी भाजपच्या या भूमिकेवर आपली उघड नाराजी व्यक्त केली.

तर याच नाराजीचा फायदा शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उचलत शिंदे यांना लक्ष करत त्यांची उमेदवारी जाहीर केली पण ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हे त्यांना विचारा असे म्हणत डिवचले. यानंतर लगेचच रविवारी सकाळीच मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवली येथील निवासस्थानी कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली.

या बैठकीत कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी ही बैठक बोलावल्याची चर्चा आहे. यावर भाजप कार्यकर्त्यांना तुमची नाराजी दूर झाली का ? असे खासगीत विचारले असता त्यांनी केवळ मान हलवत नकार देत स्मित हास्य केले पण यावर उघड काही बोलण्यास कोणी तयार नाहीत.

मंत्री चव्हाण यांनी देखील यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलणे टाळले. मात्र फोन दिवसांत माहिती समजेल असे त्यांनी सांगत पाडव्यानंतर कल्याण लोकसभेच्या उमेदवार घोषणेचा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT