Katchatheevu Island Row Esakal
लोकसभा २०२४

Katchatheevu Island Row: CAA विरुद्ध कच्चाथिऊ बेट? भाजपनं का उपस्थित केला हा नवा मुद्दा

Know why did BJP raise this new issue? | कच्चाथिऊ बेटावरुन भाजपनं काँग्रेस आणि तामिळनाडू सरकारला घेरलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात नागरिकत्व सुधारणा कायदा नुकताच लागू करण्यात आला आहे. यामध्ये मुस्लिमांचा समावेश नसल्यानं विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यापार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या पूर्वीच्या भारताच्या कच्चाथिऊ बेटाचं प्रकरण आज पुन्हा चर्चेत आलं आहे.

कच्चाथिऊ बेटावरील तमिळ नागरिकांवर अन्याय-अत्याचार होत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत नुकतंच ट्वीट केलं असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील सोमवारी सकाळीच पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला.

यावरुन निवडणुकीच्या तोंडावर सीसीएचा विरोध थोपवण्यासाठी भाजपनं हा मुद्दा समोर आणल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. (Katchatheevu Island Row is it link to CAA why did bjp raise this new issue)

पण हा कच्चाथिऊ बेट काय आहे? ज्यावरुन भाजपनं तामिळनाडू सरकार आणि काँग्रेसवर घेरलंय हे आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला पाहुयात पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन काय म्हटलंय? त्यांनी म्हटलं की, द्रमुकनं केवळ तोंडाच्या वाफा सोडण्याशिवाय तामिळनाडूच्या हिताचं रक्षण करण्यासाठी काहीही केले नाही. कच्चाथिऊ बेटाबाबत नव्यानं समोर आलेल्या तपशीलांनी द्रमुकंचं दुटप्पी धोरण पूर्णपणे उघड पडलं आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस आणि द्रमुक हे दोन्ही पक्ष घराणेशाहीचे पक्ष आहेत. त्यांना फक्त आपल्याच मुला-मुलींची काळजी आहे, त्यांना इतर कोणाचीही पर्वा नाही. कच्चाथिऊ बेटांद्दलच्या त्यांच्या उदासीनतेमुळं आमच्या गरीब मच्छीमार आणि मच्छीमार महिलांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशा प्रकारे भारताची एकता आणि अखंडता, हितसंबंध कमजोर करण्याचं काम गेल्या ७५ वर्षांपासून काँग्रेसनं केलं आहे.

नेमका वाद काय?

नुकत्याच एका माहिती अधिकार अर्जातून ही बाब समोर आली आहे की, तामिळनाडूच्या कच्चिथाऊ बेट श्रीलंकेला सोपवण्यात आलं आहे. सन १९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारनं हा निर्णय घेतला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी या माहितीसाठी आरटीआय दाखल केला होता. हे कच्चाथाऊ बेट हिंदी महासागराच्या दक्षिण दिशेला स्थित आहे. (Marathi Tajya Batmya)

२८५ एकरात पसरलेलं हे बेट भारत-रामेश्वरम आणि श्रीलंका या यांच्यामध्ये होतं. १७ व्या शतकात हे बेट मदुराईचे राजा रामानंद यांच्याकडं होतं. त्यानंतर इंग्रजांच्या काळात त्याचा समावेश मद्रास प्रेसिडन्सीमध्ये झाला. हे बेट मच्छिमारीसाठी चांगलं बेट मानलं जातं, त्यामुळं भारत आणि श्रीलंका या दोघांकडून या बेटावर हक्का सांगितला जातो.

श्रीलंकेला का दिलं बेट

सन १९७४ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कच्चाथिऊ बेट श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष श्रीमावो भंडारनायके यांच्यामधील एका तडजोडीच्या स्वरुपात श्रीलंकेला दिलं. या करारानुसार २६ जून रोजी कोलंबो आणि २८ जून रोजी दिल्लीत दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली.

पण यासाठी काही अटीशर्थीं ठेवण्यात आल्या होत्या. या बेटाचा वापर भारतीय मच्छिमारांना विसाव्यासाठी करता येईल पण या बेटावरील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी भारतीयांना विनाव्हिजा जाण्याची परवनागी नसेल. तसेच भारतीय मच्छिमार या बेटावर मासेमारी देखील करता येणार नाही. (Latest Maharashtra News)

इंदिरा गांधींचा विरोध

जेव्हा इंदिरा गांधी यांनी तामिळनाडूचं हे बेट श्रीलंकेला दिलं होतं तेव्हा त्यांना तामिळनाडूतून खूपच विरोध झाला. तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी याला कडाडून विरोध केला. यावरुन १९९१ मध्ये तामिळनाडू विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावात हे बेट परत मिळवण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात गेला.

सन २००८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत कच्चाथिऊ बेटावरुन झालेल्या कराराला अमान्य घोषित करण्याची मागणी करण्यात आली. याचिकेत म्हटलं की, भेटीस्वरुपात या बेटाला श्रीलंकेला देणं हे असंविधानिक आहे. २०११ मध्ये सुद्धा जयललिता जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री बनल्या तेव्हा त्यांनी विधानसभेत याविरोधात प्रस्ताव मांडला होता.

सध्याची परिस्थिती काय?

सध्याच्या घडीला तामिळनाडूच्या अनेक भागात माशांचं प्रमाण कमी झालं आहे. भारतीय मच्छिमार मसेमारीसाठी आंतरराष्ट्रीय सीमारेषा पार करुन कच्चाथिऊ बेटावर जातात. यामुळं अनेकदा श्रीलंकेच्या नौदल या मच्छिमारांना ताब्यात घेतलं आहे. याच्या माध्यमांमध्ये अनेकदा बातम्याही येतात. पण आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बेटाचा विषय ऐरणीवर आणला गेला आहे. यावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ट्विट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT