Arvind Kejriwal sakal
लोकसभा २०२४

Arvind Kejriwal : देशभर २४ तास वीज, मोफत शिक्षण ; केजरीवालांनी दिली ‘गॅरंटी’,‘एमएसपी’चेही आश्‍वासन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ‘मोदींची गॅरंटी’ आणि काँग्रेसने न्यायपत्रात दिलेल्या विविध गॅरंटीनंतर आता आम आदमी पक्षानेही जनतेला दहा गॅरंटी दिल्या आहेत. ‘

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ‘मोदींची गॅरंटी’ आणि काँग्रेसने न्यायपत्रात दिलेल्या विविध गॅरंटीनंतर आता आम आदमी पक्षानेही जनतेला दहा गॅरंटी दिल्या आहेत. ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘केजरीवालांची गॅरंटी’ जाहीर करत, त्या माध्यमातून जनतेला दहा आश्वासने दिली आहेत. २४ तास वीज देऊ, चीनने कब्जा केलेली जमीन परत घेतली जाईल, अग्निवीर योजना बंद केली जाईल, तसेच ‘एमएसपी’ची गॅरंटी दिली जाईल, असे केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत नमूद केले.

मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी आरोप असलेल्या अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी एक जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. तुरुंगातून बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी दिल्लीत प्रचाराचा धडाका लावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर त्यांनी रविवारी ‘आप’चे आमदार तसेच निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची बैठक घेत चर्चा केली. यानंतर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी फोल ठरल्याचा दावा केला. तसेच, ‘इंडिया’ आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत आल्यास दहा आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असा त्यांनी दावा केला.

केजरीवाल म्हणाले, ‘‘भाजपच्या वॉशिंग मशिनचा विनाश करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. प्रामाणिक लोकांना तुरुंगात पाठविण्याची आणि भ्रष्ट लोकांना संरक्षण देण्याची व्यवस्था संपविली जाईल. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे सर्व ठिकाणी भ्रष्टाचारावर प्रहार केला जाईल. ‘जीएसटी’चे सुलभीकरण केले जाईल. एक अशी व्यवस्था आणली जाईल की ज्याठिकाणी व्यापारी खुलेपणाने व्यापार करू शकतील.’’

पंतप्रधान मोदी यांनी असंख्य आश्वासने दिली होती, पण त्यातले एकही पूर्ण केले नाही. उलट आम्ही पंजाब आणि दिल्लीत चांगल्या शाळा, चांगली रुग्णालये, मोफत वीज-पाणी देण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण केले आहे. दिल्ली आणि पंजाबमधील आमचे काम पाहून भाजपवाले घाबरले आहेत. त्यांचे राजकारण सपशेल अपयशी ठरले आहे. अशा स्थितीत आम आदमी पक्षच देशाला नवी दिशा दाखवू शकतो.

- अरविंद केजरीवाल,

‘आप’चे नेते

केजरीवालांची आश्‍वासने

  • वीज : देशभर २४ तास वीज, गरिबांना मोफत वीज

  • शिक्षण : प्रत्येक गावात चांगल्या सरकारी शाळा, शिक्षण मोफत

  • आरोग्य : प्रत्येक गावात मोहल्ला क्लिनिक

  • देश : चीनने बळकावलेली जमीन परत घेणार

  • जवान : अग्निवीर योजना बंद करणार

  • शेतकरी : शेतमालाच्या एमएसपीला स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार गॅरंटी

  • गणराज्य : दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार

  • बेरोजगारी : पुढील एका वर्षात दोन कोटी रोजगार दिले जातील

  • भ्रष्टाचार : भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालणारे ‘वॉशिंग मशिन’ बंद करणार

  • कर : जीएसटीची दडपशाही बंद करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

Latest Marathi News Updates : अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या देवगिरी बंगल्यावर फेऱ्या

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

SCROLL FOR NEXT