Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : माझ्या मुलाचा पराभव व्हावा ,अँटनी ; काँग्रस पक्ष हाच धर्म असल्याचे प्रतिपादन करत भूमिका केली स्पष्ट

ए. के. अँटनी यांनी काँग्रेसच्या बाजूने भूमिका घेतल्याने येथे काँग्रेसला लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी आणि मुलगी पद्मजा वेणुगोपाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे

सकाळ वृत्तसेवा

काँग्रेसला होणार फायदा?

ए. के. अँटनी यांनी काँग्रेसच्या बाजूने भूमिका घेतल्याने येथे काँग्रेसला लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी आणि मुलगी पद्मजा वेणुगोपाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाला अँटनी यांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोपही होत होता. ए. के. अँटनी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर याचा लाभ काँग्रेसला होणार असल्याचा दावा केला जात आहे. भाजप पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यास राज्यघटनेत बदल करण्यात येतील आणि लोकशाहीचा अंत होईल असा आरोपही अँटनी यांनी केला आहे.

तिरुअनंतपुरम : ‘‘भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माझ्या मुलाचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव व्हावा आणि काँग्रेसचे उमेदवार अँटो अँटनी यांचा विजय व्हावा,’’ अशी इच्छा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी मंगळवारी व्यक्त केली आहे. तिरुअनंतपुरम येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

अँटनी म्हणाले, ‘‘माझ्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकला आहे. माझ्यासाठी पक्ष आणि कुटुंब या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. मी कर्नाटक विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असल्यापासून हे मी माझे धोरण ठेवले आहे. माझ्यासाठी काँग्रेस हाच माझा धर्म आहे.’’ प्रकृतीअस्वास्थ्यामुळे मी तिरुअनंतपुरम बाहेर जाऊ शकत नाहीये मात्र माझी भूमिका स्पष्ट होणे आवश्‍यक असल्यानेच मी पत्रकार परिषद घेत आहे, असेही अँटनी यांनी यावेळी सांगितले.

केंद्रात सत्तेत असणारा पक्ष भारताच्या मूलभूत संकल्पनेला संपविण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे त्यांना कसे रोखायचे हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे, असे अँटनी म्हणाले. ‘‘सध्याची स्थिती ही करा अथवा मरा अशी आहे,’’ असा दावाही त्यांनी यावेळी केला. भाजपचे केरळमधील चांगले दिवस संपले असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणीत ‘एनडीए’ राज्यातील सर्व मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर फेकला जाणार असल्याचे भाकीत अँटनी यांनी केले.

काँग्रेसचे नेते कालबाह्य : अनिल

‘‘काँग्रेसचे नेते आता कालबाह्य झाले आहेत,’’ अशा शब्दांत भाजपचे उमेदवार आणि ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल यांनी ए. के. अँटनी याच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे उमेदवार अँटो अँटनी यांना पाठिंबा देणाऱ्या वडिलांबद्दल ही त्यांनी सहानुभूती व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT